काय आमदार निवास…काय खोली!!!!

0
177
जामखेड न्युज——
शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. या घडामोडींमध्ये काय झाडी. काय डोंगर..काय हाटील या डायलॉगने शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू महाराष्ट्रभर फेमस झाले. मात्र, नुकतेच शहाजी बापू पाटील एका दुर्घटनेतून थोडक्यात बचावले आहेत. आमदार निवासमधील शहाजी बापूंच्या खोलीतील छत अचनाक कोसळ्याची घटना घटना घडली आहे. त्याबचावले मुळे काय झाडी..काय डोंगर डायलॉग फेम शहाजी बापूंवर काय आमदार निवास…काय खोली म्हणण्याची वेळ आली होती.
अचानक छत कोसळले
बुधवारी मध्यरात्री आकाशवाणी आमदार निवासमधील शहाजी बापूंच्या खोलीच्या छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. यावेळी शहाजी बापू पाटील खोलीतच होते. मात्र, ते सुखरुप असून या दुर्घटनेतून शहाजी बापू थोडक्यात बचावले. या घटनेची माहिती मिळताच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत खोलीची पाहाणी केली. सध्या ही खोली दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आली आहे.
एका डायलॉगमुळे शहाजी बापू फेमस
सांगोला मतदार संघाचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांचा काही दिवसांपूर्वी एक ऑडिओ कॉल व्हायरल झाला होता. आसाममधील गुवाहाटी याठिकाणी गेल्यानंतर शहाजी बापू पाटील यांनी आपल्या एका कार्यकर्त्याला फोन करून तेथील परिस्थितीचं वर्णन केलं होतं. “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं एकदम ओके मदी हाय” अशा आशयाचा त्यांचा डायलॉग व्हायरल झाला होता. हा डायलॉग इतका व्हायरल झाला की अक्षरश: लोकांना वेड लावले. एवढंच नाही तर या डायलॉगवर गाणं सुद्धा बनवण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here