भाजपा प्रदेशाध्यक्ष पदासाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचे नाव आघाडीवर

0
263
जामखेड प्रतिनिधी
            जामखेड न्युज——
        शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अद्याप खातेवाटप झालं नाही. तरी सुद्धा दोन्ही पक्षातील बरेच नेते आणि आमदार मंत्रीपदासाठी उत्सुक आहेत. त्यात आता कोणाची वर्णी लागते हे पहाणं महत्वाचं ठरणार आहे.त्यातच भाजपचे आताचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपद मिळणार आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्षपदाची  त्यांची जागा येणाऱ्या काळात रिकामी होणार आहे. तेव्हा त्या जागेसाठी उमेदवार निश्चित करावा लागणार आहे. 
   यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून नुकतेच विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडणून आलेले राम शिंदे यांचे नाव पुढे आले असून ‘ओबीसी’ चेहरा म्हणून आमदार राम शिंदे यांना प्रदेशाध्यक्षपद देऊन राज्यात बळ देण्याची शक्यता नाकारता येत नाही नेतृत्वाशी जवळीक ठेवणारा चेहरा म्हणूनही राम शिंदे यांच्याकडे पहिले जाते. 
                    शिवसेना व भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर आता लवकरच मंत्रीपद वाटप होणार असल्याच्या हालचालींना वेग आला असून मंत्रीपद वाटप झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे जाणार यांची जोरदार चर्चा रंगात आली असून प्रदेशाध्यक्ष पदासाठी आमदार आशिष शेलार यांच्यासह आमदार राम शिंदे यांचे नाव पुढे आले असून २०१४ च्या फडणवीस सरकार मध्ये राम शिंदे यांच्याकडे गृह, पणन, पर्यटन, आरोग्य, राज्यमंत्रीपदासह ओबीसी,राजशिष्टाचार,मृद जलसंधारण या महत्वाच्या चार खात्यांची कँबिनेटची जबाबदारी त्याच्याकडे देण्यात आली होती,भाजप सरकारची ‘जलयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी राबवली. 
  २०१९ साली राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्याकडून पराभव झाल्यानंतर भाजप राम शिंदे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून त्यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात आली त्यातच आता शिवसेना व भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यातून संभाव्य मंत्र्यांच्या यादीतही आ राम शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे.त्यासोबत नगरचे पालकमंत्रीपदही राम शिंदेंना संधी मिळणार असल्याची चर्चा जिल्हाभर होत असताना आता भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी आमदार राम शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे..शांत, संयमी असलेले राम शिंदे यांच्या रूपात धनगर समाजातील व ओबीसी चेहरा म्हणून एक सुसंस्कृत व पक्षनिष्ठ चेहरा देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे,जनतेच्या प्रश्रासंदर्भात मात्र ते कायम आक्रमक राहिलेले आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here