जामखेड न्युज——
गेल्या अडीच वर्षात मतदारसंघातील अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मदतीने विकासकामे नागरीकांपर्यत तसेच गरजूंच्या घरोघरी योजना पोहचविण्याचे काम केले. यापुढेही सत्ता बदल झाला असला व कोणाचीही सत्ता आली तरी किंवा मंत्र्याचे पाय धरायची वेळ आली कर्जत जामखेडच्या विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही. तसेच विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. सत्ता असो व नसो रोहितपर्व चे विकासपर्व सुरूच राहणार असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.

आज दि. ६ जूलै रोजी कर्जत जामखेड मतदारसंघातील गरजू व वंचित कुटुंब धारकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत प्रमाणपत्र वाटप मेळावे पार पडले या अंतर्गतच जामखेड येथिल राज लॉन्स येथे जामखेड तालुक्यातील नवीन ८००० नागरिकांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत सामाविष्ट करण्यात आले असून यातील काही लाभार्थींनी प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांसमोर केलेल्या कामाचा आढावा घेताना आ. रोहित पवार बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रा. मधूकर राळेभात, जामखेड तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी सभापती सुर्यकांत मोरे, विजयसिंह गोलेकर, मंगेश आजबे, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, माजी सरपंच हनुमंत पाटील, जेष्ठ नेते वैजीनाथ पोले, बापूसाहेब शिंदे, नरेंद्र जाधव, माजी नगरसेवक मोहन पवार, पाँलिटेक्निक काॅलेजचे प्रिन्सिपॉल प्रा.विकी घायतडक, प्रकाश काळे, प्रकाश सदाफुले, रमेश आजबे, जमीर सय्यद, डाॅ. शोभा आरोळे, विश्वनाथ राऊत, बबन तुपेरे, दुकानदार संघटनेचे अध्यक्ष संतोष पवार आदींसह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, माजी नगरसेवक रेशन धान्य दुकानदार व नवीन लाभार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. रोहित पवार म्हणाले की, मतदार संघाचा विकास करत असताना केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून जामखेड तालुक्यात १८ शे कोटींपेक्षा जास्त निधीचे हायवेची कामे सुरू करण्यासाठी प्रयत्न केला, पिण्याच्या पाण्यासाठी जल जीवन योजना १००% गावांचा समावेश लाईट बील कमी येऊन पाणी पट्टी कमी यावी म्हणून सोलार साठी प्रयत्न, फिरता दवाखाना, पाच अॅम्ब्युलन्स वस्त्यावस्त्यांवर नेला ८० हजार तपासण्या केल्या,मोफत डोळ्यांचे आॅपरेशन, कर्जत ५० कोटी वयजामखेड ५० कोटींची हाॅस्पिटल तसेच अन्न सुरक्षा योजनेबाबत बोलताना सांगितले की, जिल्हा अधिकारी, प्रांत अधिकारी संबंधित अधिकारी, पदाधिकारी कार्यकर्ते जे संबंधित त्यांच्या प्रयत्नातून यापूर्वी १३ हजार लाभार्थींना आजच्या मेळ्यात ८००० लाभार्थींना निवड झाल्याबद्दल प्रमाणपत्र वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. याबरोबरच शिक्षणाच्या बाबतीत आंगणवाडी पासून कामे सुरू केली, महाराष्ट्रत सर्वात जास्त कामे ८० कोटींचे ९५० पाणंद रस्ते केले ज्याचा अडीच लाख लोकांना फायदा झाला, ७५०० तरूण तरूणींना शिकाऊ लायसन्स दिले. १७ किमी नांदणी नदीचे खोलीकरण केले. आरोग्यदूत यांच्या माध्यमातून दिंडी १७५०० वारकऱ्यांना सेवा देण्याचे काम केले. अद्याप पर्यंत आपल्या तालुक्यातील १२००० वारकरी गेलेले आहेत. पंढरपूरमध्ये घेतलेल्या जागेवर तात्पुरत्या सोईसुविधा निर्माण केलेल्या.
इतके सर्व करत असतानाही विरोधकांकडून विरोध केला जात आहे. आजचे कर्जत जामखेड येथिल आजचे मेळाव्यावे होऊ नयेत यासाठी प्रयत्न करण्यात आले. तसेच अधीकाऱ्यांवर विविध प्रकारे दबाव आणला जात आहे. मात्र कोणत्याही अधिकाऱ्यांवरील चुकीच्या दबाव सहन केला जाणार नाही.मी आमदार म्हणून तालुक्यातील सर्व जनतेच्या बरोबर आहे असेही प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी केले. यावेळी प्रा. मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, विजयसिंह गोलेकर, नरेंद्र जाधव आदिंचीही भाषणे झाली