जामखेड न्युज——
डिजिटल जगात आज प्रत्येकांकडे स्वत:चा फोन आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण आज मोबाईल वापरतात पण आम्ही जर तुम्हाला सांगितले की मोबाईलचा शोध लावणाराच जर स्वतः मोबाईल फोन वापरत नसेल तर.. हो, हे खरंय. (Martin Cooper is advising people to use mobile less)

मोबाईलचा शोध लावणारे मार्टिन कूपर (martin cooper) स्वतः मोबाईल फोन वापरत नाही.1973 मध्ये मार्टिन कूपरने मोटोरोला कंपनीच्या त्यांच्या टीमचा पहिला मोबाइल शोधला. ज्याचे वजन दोन किलो होते. न्यूयॉर्कच्या रस्त्यावर उभं राहून जेव्हा मार्टिन कूपरने त्याच फोनवरून पहिला कॉल केला तेव्हा त्याचा शोध कितपत यशस्वी होईल याची त्याला कल्पना नव्हती. पण आता मार्टिन कूपर लोकांना मोबाईलचा वापर कमी करण्याचा सल्ला देत आहेत.

एका मुलाखतीत त्यांनी तर सर्वांनाच खुलासा केलाय.या मुलाखतीत ते म्हणाले की ते २४ तासात फक्त ५ टक्के वेळ मोबाईल वापरण्यात घालवतात. मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले की, जे लोक दिवसरात्र मोबाईल वापरतात त्यांचे काय होणार? यावर मार्टिन म्हणाले की, अशा लोकांनी आपला मोबाईल बंद करून थोडं आयुष्य जगावं.मार्टिनने पहिल्या फोनचा शोध लावला तेव्हा मोबाईल 10 तासात चार्ज व्हाया आणि मोबाईल फक्त 25 मिनिटे चालायचा. त्याने शोधलेला फोन खूपच भारी होता. त्याची लांबी दहा इंच होती. आता पन्नास वर्षांनंतर मार्टिनला असे वाटते की मोबाईलमुळे लोकांच्या जगण्याचा आनंद हरवलाय.