जामखेड न्युज——
‘एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी राज्याचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार महिन्याच्या पहिल्या शनिवारी जामखेड शहरातील वार्ड क्र.८ मध्ये एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय-धोरणे,स्थानिक अडीअडचणी, प्रश्न तसेच पक्षाचे विचार याबाबत विचारविनिमय करून,स्थानिक युवा, ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधला गेला.सर्वसामान्य माणसांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आ.रोहित दादा पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, असा विश्वास पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारींनी यावेळी दिला.

यावेळी शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष उमरभाई कुरेशी, तालुका सरचिटणीस प्रकाश काळे,कोअर कमिटीचे सदस्य प्रदिप शेटे,युवा नेते अमोल लोहकरे, प्रभागातील मा.ग्रा.पं.सदस्य रघुनाथ आबा पोकळे,निवृत्त प्राचार्य ढोबे सर,शहर उपाध्यक्ष प्रा.राहुल आहिरे सर, विद्यार्थी तालुकाध्यक्ष रतन काळे, युवा कार्यकर्ते ऋषी कुंजीर,चंद्रकांत गायकवाड, मोरे नाना, गणपत बनगे, ईस्माईल सय्यद,दिपक घायतडक,प्रथमेश कोकणे, सुरज बनकर, निखिल विश्वकर्मा, कांतीलाल शिंदे आदी उपस्थित होते.