जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज——
तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या असलेल्या पिंपरखेड विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी पांडुरंग ढवळे यांची तर उपाध्यक्षपदी आनंदराव भापकर यांची बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुशराव यांच्या सुचनेनुसार या निवडी करण्यात आली.

पिंपरखेड सेवा संस्थेची सार्वत्रिक निवडणूक १० जुन रोजी होऊन पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुशराव ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी जनसेवा मंडळाने एकतर्फी १३ विरूद्ध शुन्य असा एकतर्फी विजय मिळवून ३५ वर्षांपासूनची सेवा संस्था ताब्यात ठेवली होती व यावेळी पुन्हा विजय मिळविला.

पिंपरखेड सेवा संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी निलेश मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरखेड सेवा संस्थेच्या कार्यालयात संचालक मंडळाची बैठक १ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षपदासाठी पांडुरंग ढवळे व उपाध्यक्ष पदासाठी आनंदराव भापकर यांचे एकमेव उमेदवारी अर्ज वेळेत दाखल झाले. यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी निलेश मुंडे यांनी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. या निवडीनंतर कार्यकर्ते यांनी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
यावेळी संचालक मंडळ पाराजी नामदेव
ढवळे, भगवान आप्पा ओमासे, शिवाजी मथुरादास ढवळे, दगडू आंबादास कदम, मोहन रंगनाथ शिंदे, शेख रहेमान महेबूब, गजराबाई सुदाम लबडे, दगडाबाई नवनाथ ढवळे, करिष्मा रवींद्र रोही, संभाजी ज्ञानदेव कारंडे, संभाजी तान्हाजी सातपुते उपस्थित होते. निवडीनंतर पंचायत समितीचे माजी उपसभापती अंकुशराव ढवळे म्हणाले, पिंपरखेड सेवा संस्थेच्या निवडणुकीत मागील ३५ वर्षाच्या पारदर्शक कारभारामुळे सभासद विश्वास टाकीत आहे. आम्ही विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सभासद हिताचा कारभार करणार असल्याचे ढवळे यांनी सांगितले.









