Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि समर्थ हॉस्पिटल जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री...

जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि समर्थ हॉस्पिटल जामखेड यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री सिद्धेश्वर महाराज पालखीचे जामखेड नगरीत कोठारी प्रतिष्ठानकडून स्वागत.  आपल्या कार्यातून माणुसकीचा संदेश देणारे संजय कोठारी  – विजयसिंह बांगर

0
261
जामखेड  प्रतिनिधी
                जामखेड न्युज——
जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि समर्थ मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री सिद्धेश्वर महाराज पालखीचे मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले.
      गेली १६ वर्षापासून कोठारी प्रतिष्ठाणच्या वतीने दिंडीची सेवा करण्यात येत आहे.  कोठारी प्रतिष्ठान कडून यावर्षी देखील मोठ्या उत्साहात दिंडीचे स्वागत केले. शुक्रवारी ( दि. १)  सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी कोठारी प्रतिष्ठान मार्फत बुरझड ( जिल्हा धुळे ) येथील श्री क्षेत्र सिद्धेश्वर महाराज यांची पायी दिंडीचे अशोक महाराज लामकानीकर यांचे बुरझड ते पंढरपूर दिंडीचे स्वागत परमपूज्य चंदन बालाजी म.सा.आणि परमपूज्य पद्मावतीजी म.सा.आदी ठाणा ६ यांच्या उपस्थितीत आणि यांच्या आशीर्वादाने जामखेड शहरांमध्ये भव्य दिडींचे आगमन झाले आहे.
सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह बाळा बांगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास तहसीलदार  योगेश चंद्रे , पोलीस निरिक्षक संभाजीराव गायकवाड, दुय्यम निबंधक मनोज पाटेकर, सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार , ह.भ.प.विजयकुमार बागडे सर,हदयरोग व मधुमेहतज्ञ डॉ.अमोल भगत , पार्श्वभूमीचे उपसंपादक श्री चिंचोलकर, ॲड.हर्षल डोके, डॉ.सुरेश काशिद, लक्ष्मण भोरे, सचिन गाडे, एम जी एस कंपनीचे गौरव अरोरा,रोहिदास केकान,अरुण लटके,सचिन देशमुख,सुमित चानोदिया,संतराम सूळ ,संजय वारभोग,हे उपस्थित होते.
यावेळी राजेंद्र कोठारी कांतीलाल कोठारी,प्रवीण छाजेड, डॉ. भरत दारकुंडे,डॉ. टिपू शेख,प्रफुल्ल सोळंकी,सुनील पितळे, संतोष  लोढा, किसान चिंतामणी, सौ राजश्री चिंतामणी,नगरसेवक अमित चिंतामणी,विलास चिंतामणी,दीपक भोरे,मनोज दुग्गड,राहुल राखेचा,तेजस कोठारी ,हर्षल कोठारी,रोहन कोठारी ,संदेश कोठारी,संकेत कोठारी, अमृत कोठारी,सोमनाथ तनपुरे,श्रवण चिंतामणी,सुभाष भंडारी ,लखीचंद बाफना,अनिल फिरोदिया ,अमोल लोहकरे,जामखेडचे सर्कल नंदकुमार गव्हाणे , विश्वजीत चौगुले, यांच्यासह कार्यक्रमात जामखेड येथील सराफ व्यापारी किसनराव चिंतामणी यांना स्वतःचे लिव्हर ट्रान्सफर करणाऱ्या त्यांच्या पत्नी राजश्री किसनराव चिंतामणी यांचा कोठारी प्रतिष्ठान मार्फत सन्मान करण्यात आला.हा सोहळा संपन्न झाल्यानंतर वारकरी भक्तांना महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडल्याबद्दल उपस्थितीतचे कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी यांनी आभार मानले.
समाजसेवेतून जीवनाला नवी दिशा
 – संजय कोठारी
    समाजसेवेतून आपल्या जीवनाला आणि समाजाला नवी दिशा मिळू शकते हे लक्षात आल्यानंतर जे काही करायचं आहे ते समाजासाठी आणि समाजातील वंचित घटकांसाठी त्यातून मिळणारे समाधान हे वेगळच आहे ते कुणालाही विकत मिळणार नाही इतकं महान आहे ते स्वतःला झोकून देऊनच मिळवावं लागेल आणि तेच मी करत आहे यातून मला जे समाधान धनदौलतीतून मिळणार नाही ते मला माझ्या सामाजिक कार्यातून मिळते याचा खूप मला अभिमान आहे.
– संजय कोठारी
सामाजिक कार्यकर्ते
 संजय कोठारी यांच्या सामाजिक कार्यानेच आम्ही प्रेरित
– विजयसिंह बांगर
     अनेक वर्षापासून संजय कोठारी यांचे नाव सामाजिक कार्यात ऐकत आलो आहोत आम्हाला आमच्या मित्रांना त्यांच्याकडून बरीचशी मदत देखील मिळाली आहे परंतु आज त्यांच्याच कार्यक्रमात  अध्यक्षपदाचा  मान देवून गौरव केला आहे. त्यांच्यामुळे आम्हाला सामाजिक कार्यात अधिक बळ मिळतं त्यांचं कार्य असंच वाढत जावो त्यांच्याकडून आमच्यासारख्या युवकांना मिळणारी प्रेरणा अशीच मिळत जाऊ हीच सदिच्छा.
– विजयसिंह बांगर
 सामाजिक कार्यकर्ते पाटोदा.
या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले. तर आभार संजय कोठारी यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!