Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या संत सिताराम बाबा, संत गितेबाबा देवस्थानसाठी 9 कोटी रुपये मंजूर;  ‘ब’ वर्ग...

संत सिताराम बाबा, संत गितेबाबा देवस्थानसाठी 9 कोटी रुपये मंजूर;  ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जापाठोपाठ भरीव निधी आमदार रोहित पवार यांचा पाठपुरावा

0
268
जामखेड न्युज——
 श्री संत भगवान बाबा यांचे गुरू संत श्री गितेबाबा आणि संत सिताराम बाबा यांच्या खर्डा (ता. जामखेड) येथील समाधीस्थळाला आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून राज्य शासनाने ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा दिल्यानंतर आता प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून 9 कोटी रुपये इतका भरघोस निधीही मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही स्थळांचा विकास करण्याच्या दृष्टीने हे मोठे पाऊल मानले जात आहे.
   
संत भगवानबाबा संत यांचे गुरु संत श्री गितेबाबा तसेच संत सितारामबाबा यांचे खर्डा येथे समाधीस्थळ आहे. या ठिकाणी संत श्री भगवान बाबा यांना मानणार्‍या भक्तांसह इतरही भक्तगण मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. संत गीतेबाबा यांच्या समाधी स्थळी तर संत भगवान बाबा यांची पालखी विसाव्यासाठी थांबत असते. मागील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे या समाधी स्थळांचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तांना आणि संत भगवानबाबा यांच्या पालखीसोबतच्या वारकऱ्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सोयी-सुविधा मिळत नव्हत्या. त्यामुळे भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या ठिकाणी भाविकांना पुरेशा सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक होते. शिवाय या समाधी स्थळाला तिर्थक्षेत्राचा ‘ब’ वर्ग दर्जा मिळावा, अशी भावना या परिसरातील नागरिकांची आणि भाविकांची अनेक वर्षांपासूनची होती. त्यामुळे भाविकांना विविध सुविधा मिळाव्यात आणि त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आमदार रोहित पवार यांनी या दोन्ही महान संतांच्या तीर्थक्षेत्राला 6 जानेवारी 2022 रोजी ’ब’ वर्ग दर्जा मिळवून दिला. शिवाय आता या दोन्ही स्थळांसाठी आमदार रोहित पवार यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 9 कोटी रुपये इतका भरघोस निधी मंजूर करून आणला आहे. त्यापैकी 6 कोटी रुपये आतापर्यंत वितरित करण्यात आले आहेत.
या निधीतून सभामंडप, महंत निवासस्थान, प्रसादालाय, स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत. यामुळे भाविकांची गैरसोय होणार नाही. आमदार रोहित पवार व सामान्य जनतेच्या सहकार्यातून गिते बाबा यांच्या मंदिराच्या विकासाचे काम सुरू आहे, त्यालाही यामुळे गती मिळेल, शिवाय वाढत्या पर्यटनातून स्थानिकांनाही रोजगार निर्माण होण्यासही मदत होईल.
मागील लोकप्रतिनिधी अनेक खात्यांचे मंत्री असतानाही त्यांचा शब्द केवळ राजकीय आश्‍वासनापुरताच मर्यादित राहिला. पण आमदार रोहित पवार यांनी जनतेला दिलेला शब्द खरा करून दाखवला असल्याचं या माध्यमातून दिसून येत आहे. 
*चौकट*  
संत श्री. भगवानबाबा, संत श्री. गितेबाबा आणि संत श्री. सिताराम बाबा यांना मानणार्‍या भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देऊन त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळतेय, हे माझं भाग्य आहे. या परिसराच्या विकासासाठी पुढील काळात जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न राहील. – आमदार रोहित पवार
——
चौकट
राशीनच्या जगदंबा मंदिरासाठी 3 कोटी मंजूर
आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांमुळे राशीनच्या जगदंबा माता मंदिराचा 24 कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा बनवण्यात आला आहे. त्यापैकी राज्य शासनाने 3 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून प्रशासकीय इमारत आणि प्रसादालय उभारण्यात येणार आहे. या निधीपैकी 2 कोटी रुपये वितरितही करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!