Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या कर्मचाऱ्यांना सर्व शाखेत काम करण्याची संधी मिळावी – शशिकांत देशमुख. ...

कर्मचाऱ्यांना सर्व शाखेत काम करण्याची संधी मिळावी – शशिकांत देशमुख. उदयकुमार दाहितोडे यांचा सेवापुर्ती कार्यक्रम संपन्न

0
279

जामखेड प्रतिनिधी

           जामखेड न्युज – – – –
   कर्मचाऱ्यांना संस्थेच्या सर्व शाखेत काम करण्याची संधी मिळाली पाहिजे तसे नियोजन संस्था पातळीवर करण्यात येणार आहे. आपल्या चांगल्या कामाचा फायदा सर्व शाखांना होणार आहे असे मत दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख यांनी सांगितले. 
                         ADVERTISEMENT
 
    दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या श्री साकेश्वर विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक उदयकुमार दाहितोडे यांचा सेवापुर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य अनंता खेत्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून दि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, खजिनदार राजेशजी मोरे, प्राचार्य श्रीकांत होशिंग, जुल्फिकार पठाण 
जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, सरपंच हनुमंत पाटील, माजी चेअरमन प्रा. अरुण वराट, हनुमंत वराट, माजी सरपंच कांतीलाल वराट, महादेव मुरुमकर, ज्ञानदेव मुरुमकर, पोलीस पाटील महादेव वराट, बाळासाहेब वराट, राहुल वराट, नागेश मुरुमकर, रामहरी वराट, बळीराम लोहार, कन्हैया लोहार, मधुकर लहाने, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, अर्जुन रासकर, अशोक घोलप, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, सचिन वराट, विजयकुमार हराळे, पप्पू दाहितोडे, अतुल दळवी, आण्णा विटकर, शोभा दाहितोडे, कांचन दाहितोडे, सार्थक दाहितोडे, दादा दाहितोडे, आश्रु सरोदे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
  
   यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, संस्थेत अनेक लोक चांगले काम करणारे आहेत याचा फायदा सर्व शाखांना झाला पाहिजे. विद्यार्थी घडविण्याचे पवित्र काम मनापासून केले तर निश्चितच सर्वात मोठे मानसिक स्वास्थ्य लाभते असे सांगितले.
   यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी प्राचार्य अनंता खेत्रे यांनी सांगितले की, विनाअनुदानित काळात खुप हाल अपेष्ठा सहन केल्या. सायकलवरून शाळेसाठी ये जा केली शाखा टिकवल्या यामुळेच आज संस्थेचा वटवृक्ष झाला आहे.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुदाम वराट यांनी प्रास्ताविक केले. विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात 89.80 %प्रथम क्रमांक मिळवणारी श्रेया कैलास वराट, 86.60% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविणारे अदित्य रामहरी वराट तर 86.20 % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविणारी पल्लवी रविंद्र मुरुमकर हिने तृतीय क्रमांक मिळविला याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
   यावेळी राधिका वराट, ईश्वरी मुरुमकर, शिवरत्न वराट व प्रांजली दाहितोडे , बाळासाहेब वराट, ज्ञानदेव मुरुमकर, जुल्फिकार पठाण, श्रीकांत होशिंग यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
    सत्काराला उत्तर देताना उदयकुमार दाहितोडे म्हणाले की, गेली ३४ वर्षे मी इनामी इतबारे सेवा केली जीवनात अनेक संकटे आली माझ्यावर दोन मोठ्या शस्त्रक्रिया होऊनही मी सहिसलामत आहे ते केवळ विद्यार्थ्यांच्या सदिच्छामुळेच
   अडीअडचणीच्या व विनाअनुदानित काळामध्ये संस्था व ग्रामस्थांनी वेळोवेळी सहकार्य केले याबद्दल संस्था व ग्रामस्थांचे आभार मानले. 
   कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अर्जुन रासकर व सुदाम वराट यांनी तर राजकुमार थोरवे यांनी आभार मानले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!