रावसाहेब रोहकले प्रणित गुरुमाऊली मंडळाकडे बॅक निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी जामखेडमध्ये उमेदवार चाचपणी मेळावा संपन्न

0
225

जामखेड न्युज – – –

  जामखेड येथे शिक्षक बँक निवडणुक 2022 साठी शिक्षक परिषद रावसाहेब रोहकले प्रणित गुरुमाऊली मंडळाचा उमेदवार चाचपणी मेळावा नुकताच संपन्न झाला या मेळाव्यात जामखेड तालुक्यातील अनेक इच्छुकांनी शिक्षक बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मागितली मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची गर्दी होती.
   रावसाहेब रोहकले प्रणित गुरुमाऊली मंडळाकडे बॅक निवडणुकीसाठी नारायण लहाने, वैजीनाथ गीते, शिवाजी हजारे, हनुमंत निंबाळकर, अनिल कुलकर्णी, मनिषा वाघ, प्रविण पवार, राजू कर्डिले अशा आठ जणांनी उमेदवारी मागितली.
                         Advertisements 
   रावसाहेब रोहकले प्रणित गुरुमाऊली मंडळाचा उमेदवार चाचपणी मेळावा मंडळाचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला निरीक्षक म्हणून शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष राम निकम, माजी चेअरमन अविनाश निंभोरे, विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष संजय शिंदे, शिक्षक बँकेच्या संचालिका सिमाताई निकम, शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष सुनिल पवळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
     मेळावा यशस्वी करण्यासाठी शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र मोहळकर, रावसाहेब रोहकले प्रणित गुरुमाऊली मंडळाचे तालुकाध्यक्ष हनुमंत निंबाळकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा मनिषा वाघ, युवा परिषद कार्याध्यक्ष प्रविण पवार, संतोष वांडरे यांनी परिश्रम घेतले
प्रस्तावित शिक्षक परिषदेचे जिल्‍हा कार्याध्यक्ष राम निकम यांनी केले बॅंकेचे माजी चेअरमन अविनाश निंभोरे यांनी संचालक मंडळाने पाच वर्षांत राबविलेल्या सभासदांच्या हिताच्या विविध योजनांचा आढावा घेतला तर संचालक सिमाताई निकम यांनी सांगितले की, पाच वर्षे केलेल्या पारदर्शक कारभारामुळे रावसाहेब रोहकले प्रणित गुरुमाऊली मंडळाच्या उमेदवारांना मतदान करून सभासदांनी रावसाहेब रोहकले गुरूजींच्या विचारांना पाठिंबा द्यावा असे सांगितले.
     विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष संजय शिंदे यांनी विकास मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेत विकास मंडळाची इमारत भव्य दिव्य बांधण्याबाबत विवेचन केले
  विकास डावखरे यांनी गुरुमाऊली मंडळाच्या ध्येय धोरणाबाबत मार्गदर्शन केले.
   कार्यक्रमासाठी तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक बंधु-भगिनी उपस्थित होते. यात गणपत चव्हाण, विक्रम बडे, नवनाथ बडे, सुभाष फसले, दिपक तांबे, संतोष वांडरे, हनुमंत निंबाळकर, शिवाजी हजारे, विकास हजारे, अनिल कुलकर्णी, राजेंद्र मोहळकर, नवनाथ हजारे, हिंगसे सर, प्रविण पवार, नारायण लहाने, गणेश चव्हाण, अंकुश महारनवर, भागवत निंबाळकर, वैजीनाथ गिते, प्रभाकर होडशिळ, अस्तीक हजारे, बाळासाहेब रोडे, अमर चिंचकर, बाळासाहेब औटे, अनिल आव्हाड, मिलिंद आव्हाड, बजरंग देशमुख, अभिमान घोडेस्वार, हनुमंत गोरे, संजय हजारे, राजू कर्डिले, कल्पना निंबाळकर, रत्नमाला हजारे, मनिषा वाघ, अतुल कोल्हे, दत्तात्रय कोल्हे, राजेंद्र मोहळकर, विजयकुमार रेणुके यांच्या सह अनेक मान्यवर शिक्षक बंधु-भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय रेणुके यांनी तर माजी शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपल्या रसाळ वाणीने सर्वाचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here