जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
तालुक्यातील खर्डा येथील कै. नितीन वेणूनाथ गोलेकर सेवा सहकारी सोसायटी व आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास पॅनलचे पंचायत समिती माजी सदस्य विजयसिंह गोलेकर व चेअरमन चंद्रकांत गोलेकर यांच्या नेतृत्वाखाली 12 विरुद्ध 1 असा एकतर्फी विजय साकारला आहे. तर माजी सभापती रवी सुरवसे व माजी जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल खिवंसरा यांच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित किसान क्रांती पॅनलचा दारुण पराभव झाला आहे.
या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करून गुलालाची उधळण केली खर्डा शहरातून मिरवणूक काढून फटाक्यांची व तोफांची मोठी आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला आहे.
दोन्ही पॅनल कडून या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप होऊन मोठ्या चुरशीने ही निवडणूक लढवली गेली या निकालाकडे खर्डेकरांचे लक्ष लागून राहिले होते, या विजयामुळे पुन्हा सेवा सहकारी सोसायटी वर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली आहे.
विजयी उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे सर्व सादर मतदारसंघ शिवाजी भोसले 357, भागवत ढेरे 357, मुकुंद गोलेकर 351, नंदकुमार गोलेकर 373,राजेंद्र गोलेकर 390, अबरार जिकरे 343, सुनील लोंढे 357, सुहास पाटील 362, महिला राखीव मतदारसंघ सौ नीता गोलेकर 421,सौ.पद्मिनी सुर्वे 376, इतर मागास प्रवर्ग श्रीकांत लोखंडे 380, भटक्या विमुक्त जाती/जमाती गौतम गोपाळघरे 392, अनुसूचित जाती /जमाती मतदारसंघ, सुरेश शिंदे 368, हे उमेदवार विजयी झाले आहेत तर प्रत्यक्षात 941 मतदारांपैकी 757 मतदान झाले त्यापैकी एकूण 132 मते बाद झाल्याने भाजप प्रणित किसान क्रांती पॅनलला या बाद मतांचा मोठा फटका बसल्याचे दिसून आले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून देविदास घोडेचोर यांनी काम पाहिले तर त्यांना निलेशकुमार मुंडे यांनी सहकार्य केले. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी ए. पी.आय. सुनील बडे, सहाय्यक फौजदार गाडे, पोलिस नाईक तागड, पोलीस कॉन्स्टेबल धनराज बिरादर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता









