जामखेड न्युज – – – –
दि.31 मे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी चौंडी, ता.जामखेड, जि.अहमदनगर येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘जागर स्री शक्तीचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाचे उदघाटन सुनंदाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जामखेड तालुक्याचे पोलिस निरिक्षक संभाजी गायकवाड,तहसिलदार—-, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधीक्षक श्री निलेश धुमाळ उपस्थित होते.
सदरील दिवशी चौंडी येथे सुप्रसिदध गायिका उर्मिला धनगर, अभिजित कोसंबी(सारेगमप विजेता), लोकशाहिर, पारंपरिक गोंधळ कला जोपासणारे, बाजीराव मस्तानी, तानाजी द अनसंग वॉरीअर अशा अनेक चित्रपटांत पार्श्वगायन करणारे आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख प्रा.गणेश चंदनशिवे यांचा पारंपरिक गोंधळचा कार्यक्रम सादर झाला. जय मल्हार या सुप्रसिदध मालिकेतील खंडेरायाची भूमिका साकारणारे सुप्रसिदध अभिनेते श्री देवदत्त नागे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्याबददल आपले मनोगत व्यक्त केले. तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेतील अहिल्याबाईंच्या बालपणीची भूमिका साकारणारी मराठमोळी बालकलाकार कु.अदिती जलतरेने देखिल अहिल्या मालिकेतील आपले अनुभव कथन केले. शाहिरी परंपरेतील एक सुप्रसिदध शाहीर देवानंद माळी यांचा शाहिरी/पोवाडयाचा उत्कृष्ट कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी 50 कलाकारांची धनगरी ढोल तसेच झांज वादनाने मानवंदना देण्यात आली. तर 15 हलगी व 15 संबंळ वादनाची तालबदद जुगलबंदी सादर केली. भैरिभवानी या संस्थेच्या भावना चौधरी व सहकाऱ्यांनी गोंधळाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. श्री अमेय पाटील यांनी या कार्यक्रमाचे संयोजन उत्कृष्टरित्या केले..या कार्यक्रमाच परिसरातील तसेच चौंडी ग्रामस्थांनी भरभरुन आनंद घेतला