जामखेड न्युज – – – –
महाराष्ट्र दिनानिमित्त जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून दहा ठिकाणी भव्य महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रमजान मुळे अनेक मुस्लिम युवकांना रक्तदान करता आले नव्हते. तरीही सुमारे एक हजार रक्तदात्यांनी रक्तदान केले होते खास मुस्लिम युवकांच्या आग्रहाखातर जामखेड पोलिस स्टेशन व हळगाव येथे रक्तदान शिबीराचे आज आयोजन करण्यात आले यात सुमारे १५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
जामखेड पोलिस स्टेशन व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हाळगाव या दोन ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात मुस्लिम समाजातील समाजातील नागरिकांना रमजान महिन्याचे उपवास असल्याने रक्तदान करण्यात आले नव्हते तसेच काही नागरिक बाहेरगावी असल्याने त्यांना रक्तदान करण्यात आले नव्हते अशा नागरिकांनी खास मागणी केल्याने पुन्हा एकदा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या वर्षी पासून जामखेड पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श असा सामाजिक उपक्रम राबवत आहे याला परिसरातील तरूण भरभरून प्रतिसाद देत आहेत त्यामुळे दरवर्षी हजारो रक्तबाटल्यांचे संकलन होत आहे.





