Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या औषध निर्माणशास्त्र याचे औद्योगिक क्षेत्रातील महत्त्व’ या विषयावर जामखेड महाविद्यालयात व्याख्यान संपन्न. विद्यार्थ्यांनी...

औषध निर्माणशास्त्र याचे औद्योगिक क्षेत्रातील महत्त्व’ या विषयावर जामखेड महाविद्यालयात व्याख्यान संपन्न. विद्यार्थ्यांनी औद्योगिक क्षेत्रात करिअर करावे – प्रा. नरके

0
316
जामखेड न्युज – – – – 
जामखेड महाविद्यालय,जामखेड व रसायनशास्त्र विभाग यांच्या संयुक्त  विद्यमानाने ‘औषध निर्माण शास्त्र याचे औद्योगिक क्षेत्रातील महत्त्व’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून श्री छत्रपती शिवाजीमहाविद्यालय,श्रीगोंदा येथील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. सुद्रीक यांना आमंत्रित करण्यात आले होते.
                      ADVERTISEMENT
    या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  महाविद्यालयाचे प्र प्राचार्य डॉ.सुनिल नरके यांनी भूषविले. या व्याख्यानासाठी रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. गोलेकर एस एम, प्रा.पवार डी के तसेच प्रा. राळेभात शिवाजी हे  उपस्थित होते.
श्री सुद्रीक सर यांनी त्यांच्या व्याख्यानामध्ये औषधाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व तसेच विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात असणाऱ्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच या व्याख्यानाचे अध्यक्ष मा प्र प्राचार्य डॉ सुनिल नरके यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये बोलत असताना विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील संधी ओळखून औद्योगिक क्षेत्रात मध्ये करियर करावे असे आवाहन केले व शुभेच्छा दिल्या.
 कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री गोलेकर एस एम रसायनशास्त्र प्रमुख यांनी केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रसायनशास्त्र विभागाचे प्रा. श्री तरटे एन बी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!