संभाजीराजे ज्युनियर काॅलेजमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

0
177
जामखेड न्युज – – – – 
जामखेड तालुक्यातील देवदैठण येथील संभाजीराजे ज्युनियर काॅलेज मध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
    यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय भोरे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते यावेळी प्राचार्य दादासाहेब मोहिते, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा. बहिर सर,  दिनकर भोरे मेजर, बाळासाहेब भोरे, नाहुलीचे लाला पाटील, सुरेश सरगर सर, अशोक दाताळ,  चेअरमन भोरे खंडेराव, धेंडे, ग्रा पं सदस्य राहुल धेंडे, विजय धेंडे, सतिश सरगर, भगवान भोरे गुरूजी, नानासाहेब भोरे, अविनाश भोरे, हरिविजय भोरे, विष्णूपंत भोरे, शिवाजी राऊत सह इतर ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.
   यावेळी बोलताना अध्यक्ष डॉ संजय भोरे म्हणाले की, एकही लढाई पराभूत न होणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हेच आहेत. तसेच प्रख्यात पंडितही होते वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभुषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला अशा या महान राज्याला मानाचा मुजरा असे भोरे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here