जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
जामखेड तालुक्यातील खर्डा येथिल युवक विशाल ईश्वर सुर्वे (वय ३२). याचा अज्ञात व्यक्तींनी शुक्रवार दि. १३ मे रोजी रात्री साडे आकरा वाजण्याच्या सुमारास ) या युवकाची डोक्यास जबर मारहाण करून मर्डर केला असल्याची फिर्याद जामखेड पोलीसात त्यांचा भाऊ सुशेन ईश्वर सुर्वे यांनी दिली असून त्याप्रमाणे जामखेड पोलीसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे खर्डा परिसरात खळबळ उडाली आहे.आरोपीही निष्पन्न झाले नाहीत. पोलीसांची वेगवेगळे पथके खुनाचे रहस्य शोधण्यासाठी रवाना झाले आहेत
याबाबत फिर्यादी सुशेन ईश्वर सुर्वे वय २६ रा. सुर्वे वस्ती खर्डा ता. जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, विशाल सुर्वे हा शुक्रवारी दि. १३ रोजी खर्डा येथिल एका व्यापाऱ्याचा माल आणण्यासाठी बीड जिल्ह्य़ातील वडवणी येथे गेला होता रात्री अकरा वाजता खर्डा येथिल व्यापाऱ्यांकडे माल उतरविला व घरी. जात आसताना रात्री साडे अकराच्या सुमारास सुर्वे वस्ती रोडवरील लक्ष्मीआई मंदिराच्या मागे कच्च्या रस्त्यावर अज्ञात इसमांनी अज्ञात कारणांनी अज्ञात हत्यारांनी डोक्यास डाव्या बाजूला जबर मारहाण करून ठार मारले सकाळी ही घटना लक्षात आली. घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच गुन्हे अन्वेषण विभाग, डाॅग पथक, ठसे तज्ञ यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली आहे. आज दुपारी ग्रामीण रुग्णालयात उपचार मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत आहेत. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे त्यांच्या जाण्याने खर्डा शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे..
खर्डा हे संवेदनशील गाव आहे. त्यामुळे आमदार रोहित पवारांनी प्रयत्न करून पोलीस स्टेशनला मंजुरी आणली होती कामही पुर्ण झाले होते काही दिवसातच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. त्यामुळे शुभारंभाच्या आगोदरच मर्डर करून पोलीसांसमोर आवाहन करण्यात निर्माण झाली केले आहे.









