Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड तहसिलमध्ये आपत्ती व्यवस्थापन नियोजन बैठक संपन्न

जामखेड तहसिलमध्ये आपत्ती व्यवस्थापन नियोजन बैठक संपन्न

0
272
जामखेड प्रतिनिधी 
                   जामखेड न्युज – – – – 
तहसील कार्यालय जामखेड येथे आपत्ती व्यवस्थापन मान्सून पूर्व तसेच मान्सून कालावधीत निर्माण होणाऱ्या विविध आपत्ती आणी त्याचे निवारण करणेकामी करण्यात येणाऱ्या उपाययोजना याबाबत बैठक घेण्यात आली. सदर बैठकीसाठी तहसीलदार जामखेड योगेश चंद्रे, नगरपरिषद मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते,गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर , तालुका आरोग्य अधिकारी   सुनील बोराडे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय संजय वाघ, उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग संजय कांबळे, उप अभियंता बांधकाम विभाग पंचायत् समिती बी. के. माने, उपअभियंता महाराष्ट्र राज्य विज वितरण  योगेश कासलीवाल साहेबराव, व्यव्यस्थापक बस डेपो जामखेड योगेश शिरसाठ,  पशुधन विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी. कैलास खैरे ,उप अभियंता जलसंधारण शिंदे उपस्थित होते.
     सदर बैठकी मध्ये मान्सून पूर्व सर्व कामे पूर्ण करून  घेण्याच्या सूचना सर्व विभाग प्रमुख यांना देण्यात आल्या.यात प्रामुख्याने नगरपरिषद मधील नाले सफाई करणे,मोडकळीला  आलेल्या  व धोकादायक् इमारती पाडणे, धोकादायक झाडें तोडणे, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करणे,व इतर कामे करणे. विज वितरण विभागाने धोकादायक विज पोल ,अर्धवट लटकलेल्या वीजवाहक तारा,विज पोलला घातक झाडें तोडणे याबाबत कार्यवाही करावी.यामध्ये प्रत्येक गावाचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.या आपत्ती व्यव्यस्थापन आराखड्या मध्ये सर्व गावाची संपूर्ण माहिती सोबत राहणार असून आपत्ती काळात त्याचा उपयोग होणार आहे.जलसंधारण विभागाने सर्व लघु,मध्यम आणी मोठे प्रकल्प तपासून घेऊन आवश्यक उपाययोजना करावयाच्या आहेत. बांधकाम विभागाने सर्व रस्ते,त्यावरील पूल याचे दुरुस्तीचे काम करून घ्यावे, शिक्षण विभागाने पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या शाळा तसेच निर्लेखित करावयाच्या इमारतीबाबत पाडण्याची कार्यवाही अगोदरच पूर्ण करुन् घ्यायची आहे.आरोग्य विभागाने पावसाळ्यात साथीचे येणारे रोग येऊ नये म्हणून काळजी घ्यावी,सर्व प्रकारची औषधे साठा ठेवावा,ग्राम पातळीवर साथीच्या आजाराबाबत जनजागृती करावी.
             याबाबत् सर्व विभागानी काय कार्यवाही केली त्याबाबत परत 15 दिवसानी आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!