जामखेड न्युज – – – –
पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या राजीनाम्याने श्रीलंकेत हिंसाचार उसळला आहे. दंगलखोरांनी श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या वडिलोपार्जित घराला आग लावली. मेडा मुलाना या मूळ गावातील वादग्रस्त राजपक्षे संग्रहालयावर जमावाने हल्ला केला आणि तोडफोड केली. राजपक्षे यांच्या पालकांचे दोन मेणाचे पुतळेही नष्ट करण्यात आले.

इतकेच नाही तर प्रचंड हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू झाला असून त्यात राजपक्षे यांच्या पक्षाच्या एका खासदाराचाही समावेश आहे. श्रीलंकेतील अत्यंत वाईट परिस्थिती पाहता आता गृहयुद्धाची भीती वाढत चालली आहे.
अनके आंदोलकांना पांगवण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलकांवर पोलिसांकडून पाण्याचा मारा करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी जखमी सरकारी समर्थकांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सैनिकांना जबरदस्तीने रुग्णालये उघडण्यात आले.
देशात अन्न, औषध, इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने लोक अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.
हिंसक आंदोलकांना काबूत आणण्यासाठी मोठ्या श्रीलंकन सैन्यदल प्रयत्न करत आहे . ठिकठिकाणी लष्कर तैनात करण्यात आली आहे.
श्रीलंका आतापर्यंतच्या सर्वात गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. हे संकट प्रामुख्याने परकीय चलनाच्या कमतरतेमुळे उद्भवले असून देश अन्नपदार्थ आणि इंधनाच्या आयातीसाठी पैसे देऊ शकत नाही.
भारताचा शेजारील देश श्रीलंकेमधील आर्थिक संकट आणखी बिकट होत चाललं आहे. यामुळे श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडताना दिसत आहे. आर्थिक संकटामुळे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनााम दिला. मात्र त्यानंतर देशात हिंसाचार उसळला आहे. महागाईने त्रस्त जनता रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहे. इतकंच नाही तर आंदोलकांनी तोडफोड करत हिसांचार सुरु केला आहे. आता आंदोलकांनी राजपक्षे यांच्या घराला आग लावल्याची घटना समोर आली आहे. यासोबतच राजपक्षे यांच्या समर्थकांवरही हल्ले करण्यात येत आहेत.