पोलीस पथकाची हाय प्रोफाईल धाड, तब्बल ४५ जणांवर गुन्हा दाखल २५ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त

0
194
जामखेड न्युज – – – – 
परभणी येथील सहाय्यक पोलीस अधिक्षकांच्या पथकाने सेलू शहरातील कृष्ण नगर येथे एका बंद खोलीत सुरु असलेल्या हाय प्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड टाकली आहे. पोलिसांनी रोख रक्कम, वाहने आणि जुगाराचे साहित्य मिळून २५ लाख ६५ हजार ५२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एकूण ४५ जणांवर सेलू पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाईमुळे परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तब्बल २५ लाख ६५ हजार ५२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त…
सहाय्यक पोलिस अधिक्षक अबिनाशकुमार, पोलिस कर्मचारी राजेश जटाळ, शेख ताजोद्दीन, शेळके यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांचे पथक अवैध धंद्याची माहिती काढत गस्त घालत असताना त्यांना सेलू शहरात कृष्ण नगर येथे एका बंद खोलीमध्ये विना परवाना बेकायदेशीररित्या तिर्रट जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सेलू पोलिसांना सोबत घेत छापा टाकला. यादरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांनी रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, मोटारसायकल, कार, मोबाईल मिळून तब्बल २५ लाख ६५ हजार ५२८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सहाय्यक पोलिस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या पथकाने केली कारवाई…
या प्रकरणी पो.नि. रावसाहेब गाडेवाड यांच्या फिर्यादीवरून विष्णु गणपत वाघ, विनोद माणिक राजूरकर, रफिक शफीक खान, महालिंगी गणुआप्पा कवळे, कलिम खान लाला खान पठाण, संदिप अर्जुनराव अवसरमल, ज्ञानेश्वर लिंबाजी बोंबले, बालाजी अंशीराम झांजे, भागवत वामनराव लहाने, राजाभाऊ किशनराव धापसे, दिपक शंकर सोनटक्के, धनंजय कन्हैयालाल गौंड, प्रविण प्रतापराव अवटे, सय्यद फिरोज सय्यद लियाकत, विकी रमेश शर्मा, पठाण रशिद कादर, अनंत माणिकराव रोडगे, एजाज खान नासीर खान, विजय राजाभाऊ जाधव, अब्दुल सिद्दीक जिकर जरीयावाले आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सह. पोलीस निरीक्षक अंधारे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here