जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असणारे हजारे कुटुंबिय आणखी एका पुरस्काराने सन्मानित झाले आहे. ज्योती क्रांती को-ऑप क्रेडिट सोसा.लि.च्या संचालिका आणि फेडरेशन ऑफ महाराष्ट्रच्या विद्यमान संचालिका सौ.धनलक्ष्मी अजिनाथ हजारे यांना सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र या राज्यस्तरीय पुरस्काराने नुकत्याच शिर्डी येथील पंचताराकिंत पुष्पक रिसोर्ट येथे भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आला. यामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सकाळ वृत्त समुहातर्फे आयोजित या कार्यक्रमासाठी मराठी सिनेअभिनेत्री दिप्ती देवी यांच्या शुभहस्ते पुरस्काराने सौ.हजारे यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर सकाळच्या पुणे आवृत्तीचे संपादक मा.श्री.सम्राट फडणीस,ज्योती क्रांती को-ऑप क्रेडिट सोसा.लि.चे चेअरमन मा.श्री.अजिनाथ हजारे, सकाळचे सरव्यवस्थापक मा.श्री.उमेश पिंगळे, अहमदनगर आवृतीप्रमुख मा.श्री. प्रकाश पाटील, अहमदनगरचे मुख्य जाहिरात व्यवस्थापक मा.श्री.गणेश विलायते,जेष्ट नेते मा.श्री.अशोक भांगरे, महाराष्ट्र राज्य प्रदुषण महामंडळाचे आयुक्त मा.श्री.दिलीप खेडकर,डॉ.मयुरी हजारे हे मान्यवर उपस्थित होते.
.
शहरी महिलांसोबतच आता ग्रामिण भागातील महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध क्षेत्रात आज स्वत:ला सिध्द करीत आहेत. ही बाब अभिमानास्पद आहे. मला मिळालेला पुरस्कार त्यासर्व ग्रामीण भागातील महिलांसाठी सकारात्मक प्रेरणास्त्रोत ठरेल ज्या आपल्या पंखांना बळ देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.यासाठी सकाळ माध्यम समुहाचे मनपुर्वक आभार ! असे प्रतिपादन पुरस्कार स्विकारताना मा.सौ.धनलक्ष्मी अजिनाथ हजारे यांनी व्यक्त केले.