जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
डॉ.प्रवीण मिसाळ यांची दंत सेवा खरोखर चांगली आहे.
त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी केले डॉ.मिसाळ डेंटल केअर अँड ओ पी जी एक्स रे सेंटर चा 13 वा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला यानिमित्ताने सात दिवस दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते आणि जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवनेरी अकॅडमीचे संचालक लक्ष्मण भोरे ,जामखेड चे प्रसिद्ध उद्योगपती विजय कोठारी, अरुण लटके, डॉ.सुहास सूर्यवंशी, डॉ. पांडुरंग सानप ,डॉ.महेश घोडके, भास्कर भोरे आणि अशोक मिसाळ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले गेली तेरा वर्षापासून दाताच्या समस्या साठी उत्तम उपचार देण्याचे काम डॉक्टर प्रवीण मिसाळ यांनी केले आहे तसेच यापुढेही ते आधुनिक असे दंत उपचार जामखेड करांसाठी घेऊन येत आहे सध्या हॉस्पिटलमध्ये ॲडव्हान्स रूट कॅनल ,दातांना तार बसून दात सरळ करणे, डेंटल इम्प्लांट ,दातांच्या कॉस्मॅटिक ट्रीटमेण्ट असे अत्याधुनिक उपचार रोज होत असतात तसेच संपूर्ण जबड्याचा ओ पी जी एक्स-रे सुविधा देखील उपलब्ध आहे अलीकडे डॉक्टरांनी नगर रोड येथील आपल्या स्वतःच्या जागेमध्ये भव्य असे डेंटल हॉस्पिटल स्थलांतर केले आहे याआधी 13 वर्षे त्यांनी बीड रोड येथील विजय कॉम्प्लेक्स येथे सेवा दिली यावेळी संजय कोठारी पुढे म्हणाले मी बऱ्याच दिवसापासून डॉक्टर यांचे पिताश्री अशोक मिसाळ यांना पाहत आहे त्यांनी न्यायालय मध्ये सरकारी नोकरी करून आपल्या दोन मुलांना उच्चशिक्षित बनवले त्यातील एक मुलगा डॉक्टर दुसरा न्यायाधीश या पदावर काम करत आहे या पित्याचा मला खरोखर अभिमान वाटतो तसेच 13 व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी देखील त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या यावेळी शिवनेरी अकॅडमी लक्ष्मण भोरे चम्हणाले मी बऱ्याच वेळा येत असतो डॉक्टरांनी मुलांसाठी खूप चांगली व्यवस्था केली आहे प्रत्येक रुग्णाकडे स्वतः जातिने लक्ष देतात त्यांच्या. पत्नी वैशाली मिसाळ डॉक्टर आहेत त्यासुद्धा दंत रुग्णांना सेवा देत आहेत
वरील सर्व सुविधा जामखेड मध्ये उपलब्ध आहेत









