मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औंरगाबादमध्ये गुन्हा दाखल

0
244
जामखेड न्युज – – – – – 
महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर १ मे रोजी झालेल्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सभेसाठी अटी व शर्थींसह परवानगी देण्यात आली होती. मात्र सभेदरम्यान या अटींचे पालन झाले नाही आणि नियम देखील मोडले गेल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या संदर्भात सिटीचौक पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक गजानान इंगळे यांनी फिर्याद नोंदवली आहे. त्यानुसार राज ठाकरे, राजीव जेवळीकर व इतर आयोजकांविरोधात गुरन -१२७/२०२२ कलम ११६,११७,१५३ भादवि १९७३ सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ सुधारीत ३१ जुलै २०१७ नुसार गुन्हा दाखळ करण्यात आल आहे. याबाबत अधिक तपास सिटी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी हे तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here