जामखेड प्रतिनिधी
शहराच्या सुशोभीकरणाबरोबरच बागबगीचा, चांगले रस्ते मुलांना खेळण्यासाठी मैदान व अभ्यासासाठी भव्य अशी आभ्यासिका लवकरात लवकर मार्गी लावणार आहे. तसेच स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड व हरित जामखेड साठी
स्वयंसेवकांबरोबर एक कार्यकर्ता म्हणून काम करेल असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड व हरित जामखेड साठी स्वच्छ सर्वेक्षण माझी वसुंधरा अभियानात लोकसहभाग वाढवण्यासाठी व शहराचा पहिल्या पाच मधे नंबर आणण्यासाठी आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत याचाच एक भाग म्हणून लोकसहभागाची चळवळ वाढवण्यासाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या उपस्थितीत ल. ना. होशिंग विद्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आमदार रोहित पवार, त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार, नगरपरिषदेच्या प्रशासक व प्रांताधिकारी अर्चना नष्टे, केंद्र शासनाचे स्वच्छता दूत गणेश शिंदे, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे, सावळेश्वर उद्योग समूहाचे नेते सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे, कर्जत-जामखेडचे विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, राजेंद्र पाटील, पवनराजे राळेभात, युवा नेते महेश राळेभात, दि. पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार राजेश मोरे, प्राचार्य श्रीकांत होशिंग,नगरसेवक विद्या वाव्हळ, दिंगाबर चव्हाण, अमित जाधव, मोहन पवार, अमोल गिरमे, लक्ष्मण ढेपे, मनोज भोरे, माजी सभापती सुभाष आव्हाड, देवदैठनचे सरपंच अनिल भोरे, ईस्माईल सय्यद, राजू गोरे
अॅड हर्षल डोके सह नगरपरिषद कर्मचारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले की, कर्जत-जामखेड एकात्मिक विकास फाउंडेशन मार्फत 300 बाकडे दोन्ही शहरांसाठी देण्यात आले आहेत. ते महत्त्वाच्या जागी ठेवले जातील. येत्या तीन वर्षांत जामखेड शहरात आमुलाग्र बदल झालेला असेल आपले पाहुणे मित्र नातेवाईक जामखेड शहर पाहण्यासाठी येतील असे शहर बनवायचे आहे त्यासाठी प्रत्येकाने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभागी होऊन काम करावे असे सांगितले.
यावेळी केंद्र शासनाने स्वच्छता दूत गणेश शिंदे यांनी स्वच्छता अभियान व शौचालय याविषयी मार्गदर्शन केले

कार्यक्रमाच्या मुख्य आकर्षक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अक्षया देवधर बोलताना म्हणाल्या की, स्वच्छता हि प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरूवात करा लहान मुलांना स्वच्छतेची सवय लावा ते खरे स्वच्छता दूत होतील आमदार रोहित पवार यांनी फक्त कर्जत जामखेड पुरते स्वच्छतेचे काम न करता महाराष्ट्रातील इतर शहरातही करावेत
कर्जत येथुन साठ जणांची स्वच्छता टिम मुख्याधिकाऱ्यासह सायकलवर स्वच्छतेचा संदेश घेऊन स्वच्छता लोकचळवळ व्हावी म्हणून जामखेडला आले होते. यावेळी मुख्याधिकारी गोविंद जाधव व बीजेएसचे जिल्हाध्यक्ष आशिष बोरा यांनी जामखेड करांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी केले. ते म्हणाले की, आमदार रोहित पवार यांनी आपल्यासाठी पाच हजार झाडे दिली आहेत. आपण योग्य देखभाल करून झाडांची चांगली जोपासना करू तसेच शहरातील बंद अवस्थेतील शौचालये सुरू करूण पाण्यासाठी हौदाचे बांधकाम करत आहोत. लोकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून घंटागाडीत टाकण्याचे सहकार्य करावे. स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड साठी जीव ओतून काम करू व आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांचे स्वप्नातील जामखेड बनवू