जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – – –
जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या संकल्पनेतून दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त तालुक्यातील १० ठिकाणी एकाच दिवशी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त तरूणांनी रक्तदान करावे असे आवाहन जामखेड न्युजशी बोलताना गायकवाड यांनी केले आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा पाहता जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी मागील वर्षी दि. १ जानेवारी रोजी तालुक्यातील अनेक ठिकाणी एकाच वेळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी चांगला प्रतिसाद मिळाला होता. अनेक रक्त दात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले होते.
त्यानुसारच यावेळी ही माझे जामखेड, माझी जबाबदारी या सदराखाली दि. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त एकाच वेळेस जामखेड तालुक्यात १० ठिकाणी. भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले असून रविवार दि .०१ मे २०२२ रोजी सकाळी ९ .३० ते ०५.०० वा . पर्यंत तालुक्यातील १ ) महावीर मंगल कार्यालय २ ) जामखेड महाविद्यालय . ३ ) खर्डा दुरक्षेत्र ४ ) नान्नज दुरक्षेत्र ५ ) फक्राबाद ६ ) जवळा ७ ) साकत ८ ) राजुरी ९ ) अरणगाव १० ) देवदैठण , ता . जामखेड जि . अ . नगर याठिकाणी रक्तदात्यांना आपले रक्तदान करता येणार आहे.
यावेळी जामखेड पत्रकार संघाच्या वतीनेही जास्तीत जास्त तरूणांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.