जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – –
महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीतर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व महामानवाला अभिवादन करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन प्रत्येक युवकाने आपले जीवन यशस्वी करावे असे आवाहन शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमीचे संचालक कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी केले.
दि. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ जयंती जगभर साजरी करण्यात आली. जामखेड येथिल सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली शिवनेरी अकॅडमी येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करत मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. या संचालक सेवा निवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थीना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगितले. यावेळी अकॅडमीतील प्रशिक्षणार्थी मुले-मुली उपस्थित होते









