Sunday, March 29, 2026
Home ताज्या बातम्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जामखेड शहरात सर्वपक्षीय अभिवादन सभा मोठ्या उत्साहात संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जामखेड शहरात सर्वपक्षीय अभिवादन सभा मोठ्या उत्साहात संपन्न

0
217
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – – 
     महामानव  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज जामखेड शहरात सर्वपक्षीय अभिवादन सभा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दोन वर्षे कोरोनामुळे उत्साहावर निर्बंध होते आता सुट मिळाल्याने आनंदाच्या वातावरणात सर्व पक्षीय अभिवादन खर्डा चौकात सपन्न झाली.
           गुरुवार दि.१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ व्या जयंती निमित्त जामखेड शहरातील खर्डा चौक येथे संसद भवनाची आकृती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व संविधान उद्देशिका उभा करण्यात आली होती.
        सकाळी १० वाजता जामखेडचे तहसिलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
 तसेच वकृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले.
       याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिरणीस राजेंद्र कोठारी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते  प्रा. मधुकर राळेभात, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, नगरसेवक अमित चिंतामणी, वंचितचे नेते अँड डॉ. अरुण जाधव, मनसे नेते हवा सरनोबत, प्रदीप टापरे, सनी सदाफुले, भाजपाचे शरद कार्ले, सलीम बागवान , जेष्ठ नेते प्रकाश सदाफुले, प्रा. लक्ष्मण ढेपे ,अझर काझी, बौद्धा. अशोक आव्हाड, बौद्धा. बालाजी जावळे,  मोहन पवार, दिगांबर चव्हाण, पवन राळेभात, अमित जाधव ,अँड. हर्षल डोके, प्रा. विकी घायतडक , गोरख घनवट, अर्जुन म्हेत्रे, जाकीर शेख सर, अतिष पारवे, सचिन गाडे, अमित  गंभीर, मनोज घोडेस्वार ,सुजित धनवे  व सर्व पक्षीय पदाधिकारी व भिमसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
         कार्यक्रमाचे आयोजन नगराध्यक्ष निखिल घायतडक, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, भिमजयंती महोत्सव समीतीचे अध्यक्ष राजेंद्र सदाफुले, उपाध्यक्ष मुकुंद घायतडक,बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड, प्रा.सुनिल जावळे,राजन समिंदर,विनोद सोनवणे, अनिल सदाफुले, रतन सदाफुले आदी सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते होते.
          तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी सनी (प्रिन्स) सदाफुले, राकेश घायतडक, विकीभाई गायकवाड, मनीष घायतडक, अक्षय घायतडक, प्रमोद सदाफुले, प्रतिक निकाळजे,अमोल गव्हाळे,अशोक सदाफुले आदीनी परिश्रम घेतले.
     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. राहुल आहिरे यांनी केले तर आभार राजेंद्र सदाफुले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!