Friday, March 6, 2026
Home ताज्या बातम्या आरोग्य सेवा हिच खरी ईश्वर सेवा – पांडुरंग शास्त्री ओम हॉस्पिटलचा हस्तांतरण...

आरोग्य सेवा हिच खरी ईश्वर सेवा – पांडुरंग शास्त्री ओम हॉस्पिटलचा हस्तांतरण व उद्घाटन सोहळा संपन्न

0
380
जामखेड प्रतिनिधी
गरीब व गरजू रुग्णांना आरोग्य सेवेच्या माध्यमातून चांगली सेवा देण्यात यावी, कारण आरोग्य सेवा केली तर चांगले समाधान मिळते आरोग्य सेवा हिच खरी ईश्वर सेवा आहे असे मत सौताडा येथील पाडुरंग (देवा) शास्त्री देशमुख यांनी ओम हॉस्पिटलच्या हस्तांतरण सोहळ्या वेळी व्यक्त केले.
ग्रामीण भागात आरोग्य सेवेचा विडा उचलणाऱ्या व जामखेड शहराच्या आरोग्यसेवेत नाविन्य पुर्ण सेवा देण्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या आधिपत्याखाली आत्याधुनिक सुविधांसह रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी नुकतेच जामखेड शहरातील नावाजलेल्या ओम हॉस्पिटलचा हस्तांतरण सोहळा व उद्घाटन सोहळा पं.पु.पांडुरंग (देवा) शास्त्री देशमुख सौताडा यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी जैन कॉन्फरन्स राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी,  कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख  प्रा. मधुकर राळेभात, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर,  माजी संचालक संदिप ठोंबरे, किशोर अंदुरे, पांडुराजे भोसले, विनोद बेदमुथ्था, माजी नगराध्यक्ष  विकास राळेभात, उमेश राळेभात, ओम हॉस्पिटलचे संचालक भरत दारकुंडे, डॉ अर्जुन शेळके आर्थो, डॉ. सचिनकुमार राजपुत एम.डी,मेडीसीन, डॉ सुरज तौर डॉक्टर 24 तास सेवा देणार आहेत सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी डॉ भारत दारकुंडे यांनी बोलताना सांगितले की या हॉस्पिटलला आता दर अठवड्यातुन र्ह्रदयरोग तज्ञ डॉक्टर श्रीधर बधे, मेंदु व मणक्याचे तज्ञ डॉ अनिरुद्ध पाटील, त्वचारोग तज्ञ डॉ प्राची पाटील, नाक कान घसा तज्ञ डॉ महाविर कटारीया व मुत्ररोग विकार तज्ञ डॉ निरज गांधी हे महीन्याच्या तिसर्‍या शनिवारी भेटी देणार आहेत. त्यामुळे गरजु रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. यावेळी बोलताना डॉ. अर्जुन शेळके म्हणाले मी थोड्या दिवसापूर्वीच जामखेडला आलो आहे
 मला जामखेडच्याओम हॉस्पिटलमध्ये सेवा करण्याची संधी मिळाली मी इथून पुढे २४ तास अपघातातील जखमीला अथवा रुग्णांना सेवा देण्याचा  प्रयत्न करीन तसेच हॉस्पिटल मध्ये मल्टिस्पेशलिटी, आय. सी. यु. व ट्रॉमा सेटंर सेवा देखील देण्यात येणार आहेत. जामखेड डॉक्टर असोसिएशन या कार्यक्रमास उपस्थित  होते यावेळी सचिन गाडे, समीर शेख, महेश शिंदे ,दीपक भोरे, विशाल ढवळे, दत्ता साळुंखे, भुजंग गिते, आकाश  घारगे आदी सहकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!