जामखेड येथिल राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत रायगड व बीड येथील संघ प्रथम

0
199
जामखेड प्रतिनिधी 
             जामखेड न्युज – – – – 
जामखेड युथ फेस्टिव्हल आयोजित दोन दिवसीय घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत रायगड येथील जय हनुमान कला मंच यांनी प्रथम क्रमांक तर लावणी नृत्य स्पर्धेत बीड येथील संस्कृती ग्रुप यांनी स्व महादेव राळेभात करंडक प्रथम क्रमांक मिळविला.या नुत्य स्पर्धेत राज्यासह जिल्हातील सुमारे १०० स्पर्धाकांनी सहभाग घेतला होता.
जामखेड महोत्सवाच्या निमित्ताने जामखेड युथ फेस्टिव्हल आयोजित दोन दिवसीय स्व महादेव अप्पा राळेभात करंडक राज्यस्तरीय समुह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षीचे स्पर्धेचे बारावे वर्षे आहे.या स्पर्धेचे उद्घाटन जामखेड चे तहसीलदार योगेश चंद्रे व कर्जतचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शनिवार दि २ रोजी झालेल्या राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेत रायगड येथील जय हनुमान कला मंचाने २१ हजाराचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकवले , १५ हजारांचे द्वितीय पारितोषिक पुणे येथील एंजल्स डान्स ग्रुप, तर ११ हजाराचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पुणे येथील डी डब्लू एम ग्रुप, चतुर्थ क्रमांकाचे ७ हजाराचे पारितोषिक गॅंग ए डी ए डान्स ग्रुप जामखेड व साई प्रेरणा कला मंच अलिबाग याना विभागून देण्यात आला तर प्रेक्षक प्रतिसाद पारितोषिक कलाविष्कार डान्स ग्रुप आळेफाटा याना देण्यात आला तर दि ३ रोजी घेण्यात आलेल्या लावणी नृत्य स्पर्धेत बीड येथील संस्कृती ग्रुपने ३१ हजारांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकवले, २१ हजारांचे द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पुणे येथील डी डब्लू एम ग्रुप,११ हजाराचे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक बीड येथील संस्कृती ग्रुप व पवन साळवे ग्रुप तर ७ हजाराचे चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक एस के ग्रुप जामखेड व सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कुल जामखेड याना विभागवुन देण्यात आले. यावेळी सैराट फेम अभिनेते सुरेश विश्वकर्मा यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रा मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे,संतोष पवार,गुलाब जांभळे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, कर्जत नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष सचिन घुले, डॉ भास्कर मोरे, मंगलाताई भुजबळ,गणेश डोंगरे, अलेश जगदाळे, जवळके सटवाईचे सरपंच सुभाष माने,माजी नगरसेवक मोहन पवार,सामाजिक कार्यकर्त्या ज्योतीताई रजनीकांत साखरे, अर्जुन म्हेत्रे,पवन राळेभात,दिंगबर चव्हाण,युवा उद्योजक आकाश बाफना, समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉ भरत दारकुंडे, अ‍ॅड अरुण जाधव, भानुदास बोराटे,महोत्सव समितीचे अध्यक्ष ओंकार दळवी,रजनीकांत साखरे,श्रीधर सिध्देश्वर,अविनाश बोधले,समीर शेख,जितेंद्र आढाव,दीपक तुपरे,आदी उपस्थित होते यावेळी महिला वर्गाची संख्या लक्षणीय होती. परीक्षक म्हणून पुणे येथील सीने कलाकार सागर पवार व सोनी जाधव यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवनेरी अकॅडमी जामखेड, जिव्हाळा फौंडेशन, राष्ट्रवादी सांस्कृतिक सेल, सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कूल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार निलेश दिवटे व विजयकुमार जाधव यांनी केले. यावेळी नृत्य सादरीकरणातील लक्षवेधी दिलखेचक अदाकारी,धमाल नृत्याला मिळणारी तरुणाईसह महिलांची उत्स्फूर्त दाद आणि संगिताच्या तालावर बालगोपाल कलाकारांचे थिरकणारी पावलं,जामखेडकरांसाठी आनोखी पर्वणीच ठरली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here