आखिल भारतीय वारकरी संघाचे अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार साकत मधील सप्ताहाची सांगता

0
293

 

जामखेड प्रतिनिधी

प्रतिपंढरपुर म्हणून ओळख असलेल्या व गेल्या ६७ वर्षापासुन अखंड वीणावादन व नंदादीप असलेल्या साकत मध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्रीमत भागवतकथा ज्ञानयज्ञ सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे. राज्यातील नामवंत कीर्तनकारांची किर्तने या सप्ताहामध्ये झाली आता रविवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत आखिल भारतीय वारकरी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश महाराज बोधले यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.

 

ह. भ. प. उत्तम महाराज वराट, ह. भ. प. हरिभाऊ काळे, ह. भ. प. परमेश्वर महाराज बोधले, भारत कोकाटे, दिनकर मुरुमकर, कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ भगवानराव मुरुमकर, सरपंच हनुमंत पाटील, मुख्याध्यापक दत्तात्रय काळे, ईश्वर मुरुमकर यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित असतात.

राज्यातील नामवंत कीर्तनकारांची किर्तने या सप्ताहामध्ये झालेली आहेत यात रविवारी दि २७ रोजी विनोदाचार्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे, सोमवारी दि. २८ रोजी ह. भ. प. राधाताई महाराज सानप, मंगळवारी दि. २९ रोजी पंढरपूर येथील ह. भ. प. दत्ता महाराज हुके, बुधवार दि. ३० रोजी माजलगाव येथील ह. भ. प. मधुकर महाराज सायाळकर, गुरूवार दि. ३१ रोजी पुणे येथील शंकर महाराज शेवाळे, शुक्रवार दि. १ रोजी रामायणाचार्य ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांची किर्तने झाले. तर

शनिवार २ रोजी गुरूवर्य ह. भ. प. प्रकाश महाजन बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी संस्थान यांची किर्तन सेवा होईल तसेच शनिवार दि. २ रोजी सायंकाळी सहा ते आठ दिंडी प्रदक्षिणा होईल व रविवार दि. ३ रोजी गुरूवर्य ह. भ. प. प्रकाश महाजन बोधले यांचे काल्याचे किर्तन होईल.

या सप्ताहामध्ये गायनाचार्य ह. भ. प. हरिभाऊ काळे, माऊली महाराज कोल्हे, आनंत महाराज बावडकर, भारती महाराज दासखेड, विजय महाराज बागडे, पंढरीनाथ महाराज राजगुरू, दिनकर महाराज मुरुमकर तसेच साकेश्वर भजनी मंडळ, विठ्ठल भजनी मंडळ, रामचंद्र बोधले महाराज फडावरील गायक हजर राहतील.

मृदुंगाचार्य ह. भ. प. भारत महाराज कोकाटे, भिमराव महाराज मुरुमकर, बाबा महाराज मुरुमकर, बाजीराव महाराज वराट, उत्रेश्वर महाराज वराट,, दिपक अडसुळ, सुनील भालेराव, श्रीराम भालेराव, महादेव गवळी
चोपदार – आश्रू सरोदे, आजीनाथ पुलवळे
अखंड विणा पहारेकरी – श्रीधर महाराज वराट, वसंत महाराज आडाले, सतिष मुरूमकर, बाळू भवर, टाफरे महाराज अशा या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहामध्ये राज्यातील नामवंत कीर्तनकारांची किर्तने व गायक वादकांची उपस्थिती राहणार आहे तेव्हा परिसरातील भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक भिमराव महाराज मुरुमकर व बाबा महाराज मुरुमकर यांनी केले आहे.
फोटो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here