साकत मध्ये ६७ वर्ष अखंड वीणा निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह

0
210

जामखेड प्रतिनिधी

               जामखेड न्युज – – – –
   प्रतिपंढरपुर म्हणून ओळख असलेल्या व गेल्या ६७ वर्षापासुन अखंड वीणावादन व नंदादीप असलेल्या साकत मध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह श्रीमत भागवतकथा ज्ञानयज्ञ सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या उत्साहात सुरू आहे याचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
                       ADVERTISEMENT
    रविवारी दि २७ रोजी विनोदाचार्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज पठाडे, सोमवारी दि. २८ रोजी ह. भ. प. राधाताई महाराज सानप, मंगळवारी दि. २९ रोजी पंढरपूर येथील ह. भ. प. दत्ता महाराज हुके, बुधवार दि. ३० रोजी माजलगाव येथील ह. भ. प. मधुकर महाराज सायाळकर, गुरूवार दि. ३१ रोजी पुणे येथील शंकर महाराज शेवाळे, शुक्रवार दि. १ रोजी रामायणाचार्य ह. भ. प. रामराव महाराज ढोक, शनिवार २ रोजी गुरूवर्य ह. भ. प. प्रकाश महाजन बोधले राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी संस्थान यांची किर्तन सेवा होईल तसेच शनिवार दि. २ रोजी सायंकाळी सहा ते आठ दिंडी प्रदक्षिणा होईल व रविवार दि. ३ रोजी गुरूवर्य ह. भ. प. प्रकाश महाजन बोधले यांचे काल्याचे किर्तन होईल.
    या सप्ताहामध्ये गायनाचार्य ह. भ. प. हरिभाऊ काळे, माऊली महाराज कोल्हे, आनंत महाराज बावडकर, भारती महाराज दासखेड, विजय महाराज बागडे, पंढरीनाथ महाराज राजगुरू, दिनकर महाराज मुरुमकर तसेच साकेश्वर भजनी मंडळ, विठ्ठल भजनी मंडळ, रामचंद्र बोधले महाराज फडावरील गायक हजर राहतील.
   मृदुंगाचार्य ह. भ. प. भारत महाराज कोकाटे, भिमराव महाराज मुरुमकर, बाबा महाराज मुरुमकर, बाजीराव महाराज वराट, उत्रेश्वर महाराज वराट,, दिपक अडसुळ, सुनील भालेराव, श्रीराम भालेराव, महादेव गवळी
   चोपदार – आश्रू सरोदे, आजीनाथ पुलवळे
अखंड विणा पहारेकरी – श्रीधर महाराज वराट, वसंत महाराज आडाले, सतिष मुरूमकर, बाळू भवर, टाफरे महाराज
  अशा या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहामध्ये राज्यातील नामवंत कीर्तनकारांची किर्तने व गायक वादकांची उपस्थिती राहणार आहे तेव्हा परिसरातील भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक भिमराव महाराज मुरुमकर व बाबा महाराज मुरुमकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here