शालेय उपक्रमातून संस्कार व मूल्यांची  रुजवणूक होते – गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे

0
183
जामखेड न्युज – – – – – – 
शालेय उपक्रमातून संस्कार व मूल्यांची रुजवणूक होते यातुन विद्यार्थ्यांंचा सर्वागीण विकास होतो त्यामुळे शाळेत प्रत्येक उपक्रम  राबविणे  गरजेचे आहे असे प्रतिपादन जामखेड तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे यांनी  केले.
                           ADVERTISEMENT
   जि.प.कें.प्रा.शाळा तेलंगशी  या शाळेच्या सन 2021-22या शैक्षणिक वर्षातील वार्षिक तपासणी कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी खर्डा व तेलंगशी केंद्राचे केंद्रप्रमुख मुकुंदराज सातपुते, तेलंगशी गावचे सरपंच कांतीलाल जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भागवत जायभाय, मुख्याध्यापक केशव गायकवाड, रुपेश वाणी, CRG सदस्य सचिन पवार, शिवाजी घोडके व भाऊसाहेब डिडूळ  हे यावेळी उपस्थित होते.
जि.प.कें.प्रा.शाळा तेलंगशी या शाळेतील शिक्षक उपक्रमशील आहेत.बालपणी घडविणारे शिक्षक आयुष्यभर लक्षात राहतात. विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करण्याचा प्रेरणादायी सल्लाही त्यांनी यावेळी दिला. शालेय  गुणवत्तेइतकेच संस्कार व मूल्यशिक्षणाला महत्व देणारे तेलंगशी शाळेतील शिक्षक असून शालेय गुणवत्ता उत्कृष्ट असल्याचा अभिप्राय यावेळी गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे यांनी दिला.यावेळी केंद्रप्रमुख सातपुते  व सर्व CRG सदस्य यांनी वर्ग तपासणी करुन शालेय गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत तेलंगशी शाळेच्या झांजपथकाच्या सादरीकरणाने आनंता गायकवाड यांनी केले. शालेय अभिलेखे, स्वच्छता, नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्र, संगणक प्रयोगशाळा  या सर्व बाबींची पाहणी केली. विद्यार्थ्यांचे विविध  कलागुण पाहून उपस्थित मान्यवरांनी  2101 रु. रोख स्वरुपात देऊन विद्यार्थ्यांचे भरभरुन कौतुक केले. प्रास्ताविक केशव  गायकवाड यांनी केले. शाळेत राबवित असलेल्या  सर्व उपक्रमाचे सादरीकरण सुशेन चेंटमपल्ले यांनी तर आभार विजयकुमार रेणुके  यांनी मानले. संतोष गोरे व लक्ष्मी जायभाय यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here