कर्जत शहरात उभारले जाणार अत्याधुनिक सोयी-सुविधांनी परिपूर्ण असलेले अग्निशमन केंद्र व अधिकारी कर्मचाऱ्यांना निवासस्थान रोहीतदादांनी निवडणुकीत दिलेला शब्द केला खरा

0
231
जामखेड न्युज – – – – – 
कर्जत-जामखेड मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मूलभूत व पायाभूत सोयी -सुविधांचा विकास होणे देखील गरजेचे असते हीच बाब आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी हेरून त्या सोयीसुविधांचा विकास होण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पाठपुरावा करून कर्जत-जामखेड मतदारसंघात न भूतो न भविष्यती अशाप्रकारची अनेक विकास कामे आजवर मंजूर करून घेऊन त्यासाठी निधी देखील मंजूर करून आणला आहे. याची प्रचिती कर्जत-जामखेडकरांना झालीच आहे. वाढते शहरीकरण त्यातून वाढत जाणारी दाट वस्ती हे शहरीकरणाचे प्राथमिक लक्षण असते, कर्जत शहरात होत असलेल्या विकास कामांमुळे  याठिकाणी भविष्यात होणार असलेल्या रोजगार निर्मितीचा अंदाज देखील येथील जनतेला झाल्याने हळू हळू लोक ग्रामीण भागातून कर्जतसारख्या शहरी भागात रहिवासासाठी येण्यास तयार झालेले आहेत.
                          ADVERTISEMENT
शहराची वाढती दाट वस्ती यातून वेगवेगळ्या माध्यमातून आग लागण्याचे प्रकार होत असतात. हे वेगवेगळ्या घटनांमधून आपणा सर्वांचे निदर्शनास आलेलेच आहे. अलीकडच्या काळात अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटनांतून मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाल्याचे देखील सर्वश्रुत आहे हीच बाब आमदार रोहित पवारांनी हेरली व जिल्हास्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून कर्जत शहरात नगरपंचायत अंतर्गत अग्निशमन केंद्र आणि अग्निशमन केंद्रात कार्यरत अधिकारी कर्मचारी यांच्या निवासस्थानाच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे १ कोटी रुपये निधी मंजूर करून आणला आहे, यातून कर्जत शहरातील जनता आग लागण्याच्या भीतीच्या सावटातून मुक्त होणार असून आगीतून होणार्‍या नुकसानातूनही कर्जत शहर सावरले जाणार आहे.
शिवाय अत्याधुनिक सर्व आवश्यक त्या सोयी सुविधांनी परिपूर्ण असे हे अग्निशमन केंद्र असणार आहे. आमदार रोहित पवार यांच्या या दूरदृष्टीने कर्जत शहरातील जनता भारावली असून आजपर्यंत मागच्या लोक प्रतिनिधींना कर्जत शहरातील जनतेची सुरक्षितता कशी लक्षात आली नाही?, याबाबत देखील स्थानिकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे. शिवाय या संबंधी आमदार रोहितदादा पवार यांनी निवडणुकीवेळी जनतेला दिलेला शब्द खरा करून दाखवल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. अग्निशमन केंद्र बांधकामास मंजुरी मिळाल्याने आमदार रोहित पवार यांनी मा. पालकमंत्री हसन मुश्रीफ मा.जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले मा. सहाय्यक आयुक्त नगर प्रशासन श्री खांडकेकर मा. जिल्हा नियोजन अधिकारी श्री भदाणे यांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांचे  आभार मानले आहेत. येथील जनता आमदार रोहित पवार यांचे कौतुक करीत असून दूरदृष्टीचा नेता म्हणून देखील आपापसात चर्चा रंगत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here