जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
ग्रामीण भागातील कलाकारांच्या कलेला वाव मिळावा या हेतुने येथिल जामखेड युथ फेस्टिव्हल आयोजित भव्य दोन दिवसीय राज्यस्तरीय समुह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT 

जामखेडसह राज्यातील उभरत्या कलाकारांना व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कलेच्या क्षेत्रात नेहमीच कार्यरत असलेल्या जामखेड युथ फेस्टिव्हल च्या वतीने राज्यस्तरीय दोन दिवस समुह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वर्गीय महादेव (आप्पा) राळेभात स्मृती करंडक नृत्य स्पर्धेचे या वर्षीचे १२ वे वर्ष आहे. राज्यस्तरीय समुह नृत्य स्पर्धा ही शनिवार दि २ एप्रिल व रविवार दिनांक ३ एप्रिल अशी दोन दिवस चालणार आहे. या मध्ये शनिवार दि २ एप्रिल २०२२ रोजी राज्यस्तरीय खुल्या समुह नृत्य स्पर्धेसाठी गणेश डोंगरे यांच्या कडुन प्रथम पारितोषिक, २१०००, अलेश जगदाळे यांच्या कडुन द्वितीय पारितोषिक १५०००, सुभाष त्रिंबक माने यांच्या कडुन तृतीय पारितोषिक ११०००, मोहन पवार यांच्या कडुन चतुर्थ पारितोषिक ७०००, सन्मान चिन्ह व प्रशस्तिपत्रक तर रविवार दि ३ एप्रिल रोजी लावणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. लावणी नृत्य स्पर्धेत प्रविण (दादा) घुले पाटील प्रथम पारितोषिक ३१०००, ज्योतीताई रजनीकांत साखरे यांच्या कडून द्वितीय पारितोषिक २१०००, जमिर सय्यद यांच्या कडुन तृतीय पारितोषिक ११०००, अर्जुन म्हेत्रे यांच्या कडुन चतुर्थ पारीतोषिक ७००० , प्रत्येकी सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र अशी पारितोषिके ठेवण्यात आले आहे.
ज्या स्पर्धांकांना या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांना जामखेड युथ फेस्टिव्हल चे संयोजक ओंकार दळवी मो. नं 9011501221, अविनाश बोधले, मो.९५९५४२२४२२, श्रीधर सिध्देश्वर ९८२२४१२७४१, रजनीकांत साखरे ९९२१५९१५९७, यांच्या शी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दि २ एप्रिल व ३ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता खर्डा रोड कॉर्नर येथील सावित्रीबाई फुले इंग्लिश स्कूल जामखेड, या ठीकाणी ठेवण्यात आली आहे. तसेच स्पर्धेचे बक्षीस वितरण ज्या त्या दिवशी म्हणजे स्पर्धा संपली की लगेच करण्यात येणार आहे. स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांकडे गेटपास असणे आवश्यक आहे गेटपास आयोजकाडे उपलब्ध होईल गेटपास नसल्यास प्रवेश मिळणार नसुन महिलांसाठी पासची आवश्यकता नाही.महिलाना विनापास प्रवेश दिला जाणार आहे तरी या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धांत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांन तर्फे करण्यात आले आहे.