पांढऱ्या सोन्याला ऐतिहासिक झळाळी उच्चांकी भाव

0
200

जामखेड न्युज – – – – 

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. कापसाच्या दरात (Cotton price) मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळालं आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या कापसाला (Cotton Rate) प्रति क्विंटल 12 हजार रुपये इतका विक्रमी दर मिळत आहे. आतापर्यंचा हा कापसाच्या इतिहासातील सर्वाधिक आणि विक्रमी असा भाव आहे.

ADVERTISEMENT

 

 

 

 

लवकरच कापसाचे दर 13 हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता व्यक्त केली आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला प्रति क्विंटल 12 हजार रुपये इतका विक्रमी दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यावर्षी महाराष्ट्रातील शेतकरी अवकाळी पाऊस, ओला दुष्काळ तसेच नापिकीच्या फेऱ्यात अडकला होता.

 

त्यातच कापसाची पिके जोमात असताना बोडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे कापसाचा उत्पादनात घट झाली होती. मात्र यंदा कापसाचे उत्पादन शेतकऱ्यांना हवं तसं मिळालं नसलं तरी, विक्रमी भाव मिळत असल्यानं बळीराज्याच्या आयुष्यात आनंद अन उमेदीची नवी पालवी फुलली आहे.

हमीभावापेक्षा 6 हजारांपर्यंतचा अधिक दर

यावर्षी सीसीआयनं कापसाच्या मध्यम धाग्याला 5 हजार 775 तर लांब धाग्याला 6 हजार 100 एव्हढा हमीभाव जाहीर केला आहे. त्यामुळे अकोटमध्ये हमीभावापेक्षा क्विंटलमागे 6 हजार रुपयांपेक्षा अधिक भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. यासोबतच अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतर बाजार समित्यांच्या तुलनेत हजार रुपयांपर्यंत अधिक दर मिळत आहे.

मराठवाड्यातील शेतकरी भाववाढीच्या प्रतिक्षेत

दरम्यान, विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यात कापसाला 12 हजार रुपयांचा दर मिळत असला तरी, मराठवाड्यात मात्र हाच दर 10,000 ते 10,500 दरम्यान आहे. येथील व्यापारी कापूस दरात शेतकऱ्यांची पिळवणूक करत असल्याच्या तक्रारी काही शेतकऱ्यांनी केल्या आहे.मराठवाड्यात जवळपास 60 ते 70 टक्के शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावाने कापसाची विक्री केली आहे. सध्या मोजक्याच शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक असून ते भाववाढीची प्रतिक्षा करत आहेत.

कापसाचे दर 13 हजारांचा टप्पा ओलांडणार

कापूस बाजारात सध्या मोठी तेजी आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे कापसाचा कमी झालेला पेरा आणि वाढलेली मागणी. त्यामुळे कापूस बाजारातील सध्याच्या तेजीचा रोख बघता लवकरच कापूस प्रती क्विंटल 13 हजारांचा टप्पा सहज ओलांडणार, अशी शक्यता कापूस क्षेत्रातील तज्ञ आणि अभ्यासक व्यक्त करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here