टेलिस्कोपद्वारे  पाडळी येथील विद्यार्थ्यांना आकाश दर्शन

0
300
जामखेड न्युज – – – – 
 माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्यातर्फे व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेमार्फत मंगळवार दिनांक 22/03/2022 रोजी जि. प. प्राथमिक शाळा पाडळी व पवार वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना telescope द्वारे आकाशातील तारे विध्यार्थ्यांना दाखविण्यात आले. जामखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांना टेलिस्कोप द्वारे आकाश दर्शन व तारांगण दर्शन या उपक्रमाचा पाडळी या ठिकाणाहून प्रारंभ करण्यात आला.
                           ADVERTISEMENT
 
     यावेळी तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी मा. कैलास खैरे, शिक्षण विस्तार अधिकारी माननीय दिगंबर पवार, जामखेड पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी मा. भजनावळे, केंद्रप्रमुख श्री. संतोष राऊत, के डी एफ च्या समन्वयक प्रिया कांबळे मॅडम, पाडळी गावचे सरपंच मा. श्री. बाळासाहेब खैरे, उपसरपंच मा. प्रकाश पवार, ग्रामपंचायत सदस्य मा. श्री प्रवीण खैरे, श्री बजरंग पवार, श्री शिवाजी पवार  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गणेश खैरे, श्री जालिंदर भोगल, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती शोभा कांबळे, पाडळी शाळेतील शिक्षक श्री. बळीराम अवसरे, श्री. पांडुरंग मोहळकर, श्री केशव हराळे, श्रीमती छाया जाधव, पवारवस्ती शाळेतील शिक्षक श्री. बाळासाहेब जरांडे, श्री. अमोल सातपुते तसेच गावातील ग्रामस्थ व दोन्ही शाळेतील सुमारे 165 विद्यार्थी उपस्थित होते.
    यावेळी शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. माजी राष्ट्रपती व शास्रज्ञ डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतीमांचे पूजन करून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना मा. गटशिक्षणाधिकारी यांनी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेमार्फत जामखेड तालुक्यातील विद्यार्थ्यांना टेलीस्कोपद्वारे आकाश दर्शन व तारांगण दर्शनामुळे खगोलीय माहिती मिळण्यास मदत होणार आहे, याचा सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. यावेळी सर्व विद्यार्थी ग्रामस्थ यांनी टेलिस्कोप द्वारे आकाश दर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. माननीय रोहित दादा पवार व कर्जत जामखेड  एकात्मिक संस्थेचे शाळेतील विद्यार्थ्यांना आकाश दर्शनाची संधी दिल्याबद्दल शाळेच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here