प्रेमासाठी काही पण!!!! – सरपंचपद व मुलांना सोडून महिला सरपंच प्रियकराबरोबर फरार

0
268
जामखेड न्युज – – – – 
सध्या कुठं काय घटना घडेल याचा काही नेम नाही. दररोज काही ना काही वेगळ्या घटना घडतच असतात आणि आपल्यासमोर सोशल मीडियाच्या माध्यमातून येत राहतात. आता बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातून एक अशीच बातमी समोर आली आहे, ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. सीतामंधी जिल्यातील एका महिला सरपंचाने आपलं सरपंचपद आणि खूर्चीवर पाणी सोडत आपल्या प्रियकरासोबत पळून गेली आहे.
                          ADVERTISEMENT 
विशेष म्हणजे आपण केलेलं मतदान अशा पद्धतीनं वाया गेलं म्हणून गावकऱ्यांना या महिला सरपंचाचा राग आला आहे. शिवाय, गावच्या सरपंचाने स्वतः अशाप्रकारे वागणं ही आपली आणि गावाची फसवणूक आहे असं देखील गावकऱ्यांचं मत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार या महिलेला पंचायतीच्या लोकांनी विकासासाठी मतदान करून सरपंच बनवलं, परंतु ती महिलाच आता आपल्या प्रियकरासह पळून गेली आहे.
दरम्यान, या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, कान्होली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोपरा पंचायत आहे. तेथील लोकांनी पंचायत निवडणुकीत आपले अमूल्य मत देत महिला रेखा देवी यांना सरपंच केलं होतं. मात्र, रेखा देवी आपली खूर्ची आणि मुलं सोडून प्रियकरासह पळून गेली आहे. रेखादेवीच्या या प्रकारानंतर गावात नाराजी पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here