जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
गावात सामाजिक एकोपा निर्माण करण्यात याचबरोबर सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे राम मुरुमकर यांनी सेवानिवृत्तीच्या निमित्ताने गावातील स्मशानभूमीत ६१ झाडे लावली हा खुपच स्तुत्य उपक्रम आहे असे मत पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर मुरुमकर यांनी व्यक्त केले.
२९ वर्षे नवविभागात नोकरी करून राम मुरुमकर सेवानिवृत्त झाले याबद्दल त्यांनी गावातील स्मशानभूमीत वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके, पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ भगवानराव मुरुमकर, जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गौतम उतेकर, सरपंच हनुमंत पाटील, सेवा संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण वराट सर, उपाध्यक्ष प्रमोद मुरुमकर, माजी प्राचार्य श्रीराम मुरुमकर, माजी मुख्याध्यापक सुदाम मुरुमकर, माजी सरपंच हरीभाऊ मुरुमकर, पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, सरपंच काकासाहेब चव्हाण, डॉ. अजय वराट, कैलास वराट, भाऊ पाटील, दादासाहेब मोहिते, वनपाल प्रदिप उबाळे, वनरक्षक किसन पवार, सेवानिवृत्त वनरक्षक दिनकर मुरुमकर, वनमजूर ताहेर अली सय्यद, राजाभाऊ मुरुमकर, बापू जायभाय, शहाजी नेहरकर, शिवाजी चिलगर, शामराव डोंगरे, माजी कृषी अधिकारी नवनाथ वराट, माजी चेअरमन हनुमंत वराट, माजी सरपंच कांतीलाल वराट, शिवाजी काकडे, ज्ञानदेव मुरुमकर, सोमनाथ काकडे, आश्रू मुरुमकर, भाऊसाहेब भोगल, रामकिसन लहाने, अंकुश मुरुमकर, बाळासाहेब वराट, विठ्ठल चव्हाण, रामचंद्र वराट गुरूजी, शंकर मुरुमकर, प्रविण मुरुमकर, वैभव मुरुमकर, संदीप येवले, दिलीप घोलप, विनोद मुरुमकर, नागराज मुरुमकर, वाल्मिक कोल्हे, रावसाहेब वराट सर, राजकुमार थोरवे, अशोक घोलप, जाहेद बागवान यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अनेक मान्यवरांनी राम मुरुमकर यांचा सपत्नीक सत्कार केला

पुढे बोलताना डॉ. भगवानराव मुरुमकर म्हणाले की, विठ्ठल मंदिर सभामंडप उभा करण्यात राम मुरुमकर यांचा सिंहाचा वाटा आहे क वर्ग तिर्थक्षेत्रात समावेश झाला. कार्तिकी वारी टिकवण्यात राम मुरुमकर यांचा मोलाचा वाटा आहे.
ADVERTISEMENT 

यावेळी बोलताना दिनकर मुरुमकर म्हणाले की, गावातील स्मशानभूमीत सेवानिवृत्तीबद्दल ६१ झाडे लावली हे खुपच महत्त्वाचे आहे. यामुळे गावाच्या वैभवात भर पडणार आहे.
माजी प्राचार्य श्रीराम मुरुमकर यांनी बोलताना सांगितले की, किती जगले यापेक्षा कसे जगले हे महत्वाचे आहे. २९ वर्षे इमाने इतबारे सेवा केली. नोकरी बरोबरच गावात सामाजिक व धार्मिक कार्यात राम मुरुमकर यांचे कार्य उल्लेखनीय आहे. ६१ झाडे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आॅक्सिजन देतील.
कैलास वराट यांनी बोलताना सांगितले की, राम मुरुमकर यांनी आता पुर्ण वेळ सामाजिक कार्यात खर्च करावा तसेच गावात सामुदायिक विवाह सोहळ्यांसाठी त्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी सांगितले की, विना तक्रार सेवा निवृत्त होणे कठिण काम आहे पण मुरूमकर यांनी ते केले. वनविभागाशी निगडित वृक्षारोपण काम केले हे खुपच चांगले काम आहे.
यानंतरही त्यांनी वनविभागाला सामाजिक कार्यात मदत करावी असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दादासाहेब मोहिते यांनी केले
नागराज मुरुमकर यांनी आभार मानले.