Home ताज्या बातम्या साकत-जामखेड रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य! प्रवास जीवघेणा, ऊसाचा ट्रॅक्टर पलटी, बांधकाम विभागाने जागे...

साकत-जामखेड रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य! प्रवास जीवघेणा, ऊसाचा ट्रॅक्टर पलटी, बांधकाम विभागाने जागे व्हावे! खड्ड्यांमुळे वाहनांची मोडतोड, प्रवाशांना मणक्याचे विकार, रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची महादेव वराट यांची मागणी

0
15
साकत-जामखेड रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य! प्रवास जीवघेणा, ऊसाचा ट्रॅक्टर पलटी, बांधकाम विभागाने जागे व्हावे!  खड्ड्यांमुळे वाहनांची मोडतोड, प्रवाशांना मणक्याचे विकार, रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची महादेव वराट यांची मागणी

जामखेड न्युज – – – – – – 

साकत-जामखेड रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य! प्रवास जीवघेणा, ऊसाचा ट्रॅक्टर पलटी, बांधकाम विभागाने जागे व्हावे!

खड्ड्यांमुळे वाहनांची मोडतोड, प्रवाशांना मणक्याचे विकार, रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची महादेव वराट यांची मागणी

 

साकत-जामखेड रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याची दुरवस्था इतकी गंभीर झाली आहे की, दररोज अपघात होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नुकताच ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर खड्ड्यांमुळे पलटी झाल्याने या रस्त्यावरील धोकादायक परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.

खड्ड्यांमुळे वाहनांची खिळखिळी, प्रवाशांचे आरोग्य धोक्यात
साकत-जामखेड मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून वाहन चालवताना चालकांना खड्डे चुकविण्याची कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकविताना वाहनांचा तोल जाणे, अचानक ब्रेक लावणे आणि समोरून येणाऱ्या वाहनांना बाजू देताना अपघाताचा धोका निर्माण होत आहे.

या खड्ड्यांमुळे दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहू वाहनांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होत असून, वाहनांचे नुकसान आणि दुरुस्तीचा खर्च वाढला आहे. खड्डेमय रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना पाठदुखी आणि मणक्याच्या त्रासालाही सामोरे जावे लागत असल्याची तक्रार आहे.

करमाळा-पाटोदा रस्त्याचे काम लवकर सुरू करा!
करमाळा-पाटोदा रस्ता जामखेडपर्यंत मंजूर झाल्याची माहिती असून, या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे. तसेच जामखेड ते पाटोदा हा साकतमार्गे होणारा रस्ता तातडीने मंजूर करून त्याचे काम सुरू करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

साकत-जामखेड रस्ता हा परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा मार्ग असून, शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि व्यापाऱ्यांची या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती आणि नवीन रस्त्याच्या कामाला प्राधान्य देणे आवश्यक आहे.

खड्डे बुजवा, अन्यथा तीव्र आंदोलन!
सार्वजनिक बांधकाम विभागाने साकत-जामखेड रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून रस्ता वाहतुकीस योग्य करावा. केवळ कागदोपत्री आश्वासने न देता प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थ महादेव वराट यांनी केली आहे.रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही महादेव वराट यांनी दिला आहे.

“खड्डेच खड्डे चोहीकडे, रस्ता गेला कोणीकडे?” असा संतप्त सवाल साकत परिसरातील ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात असून, आता तरी बांधकाम विभागाने जागे होऊन नागरिकांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

लवकरात लवकर खड्डे बुजवले जातील अशी माहिती बांधकाम विभागाचे उपअभियंता शशिकांत सुतार यांनी जामखेड न्युजशी बोलताना सांगितले 

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!