Home ताज्या बातम्या धनगरवस्ती शाळेचा कायापालट! लोकसहभागातून झालेला विकास राज्यासाठी दिशादर्शक – मनोहर इनामदार ...

धनगरवस्ती शाळेचा कायापालट! लोकसहभागातून झालेला विकास राज्यासाठी दिशादर्शक – मनोहर इनामदार बांधखडक जिल्हा परिषद शाळेची क्षेत्रभेट, सुलेखन कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना लाभ

0
19
धनगरवस्ती शाळेचा कायापालट! लोकसहभागातून झालेला विकास राज्यासाठी दिशादर्शक – मनोहर इनामदार  बांधखडक जिल्हा परिषद शाळेची क्षेत्रभेट, सुलेखन कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना लाभ

जामखेड न्युज – – – – – 

धनगरवस्ती शाळेचा कायापालट! लोकसहभागातून झालेला विकास राज्यासाठी दिशादर्शक – मनोहर इनामदार

बांधखडक जिल्हा परिषद शाळेची क्षेत्रभेट, सुलेखन कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना लाभ

रविवारच्या सुट्टीच्या दिवशी बांधखडक जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच माता पालक यांनी क्षेत्रभेटीअंतर्गत धनगरवस्ती (देवदैठण) येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिली.

यावेळी विद्यार्थ्यांना शाळेतील लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या विविध भौतिक सुविधा व शैक्षणिक उपक्रमांची माहिती मिळाली. तसेच विद्यार्थ्यांसाठी विशेष सुलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
धनगरवस्ती शाळेचे शिक्षक लहू बोराटे यांनी विद्यार्थ्यांसाठी सुलेखन कार्यशाळा घेतली.

सुंदर व वळणदार अक्षर, लेखनातील शिस्त आणि अक्षर सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन त्यांनी केले. या कार्यशाळेचा विद्यार्थ्यांना लेखनकौशल्य विकसित करण्यासाठी निश्चितच लाभ होईल, असे लहू बोराटे यांनी सांगितले.

यावेळी बांधखडकचे शिक्षक मनोहर इनामदार यांनी धनगरवस्ती शाळेच्या लोकसहभागातून झालेल्या विकासाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील शाळांच्या विकासासाठी ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे पुढाकार घेतल्यास शाळांचे शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम होऊ शकते. लोकसहभागातून उभारलेल्या भौतिक सुविधा आणि राबविले जाणारे उपक्रम राज्यातील इतर शाळांसाठी दिशादर्शक ठरतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना वर्गातील शिक्षणासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाली. धनगरवस्ती शाळेला भेट व सुलेखन कार्यशाळेनंतर विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी जामखेड येथील आनंदनगरीला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी आकाश पाळणे तसेच विविध मनोरंजनाच्या साधनांचा मनमुराद आनंद लुटला.

या क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद, उत्साह आणि परस्पर संवाद वाढण्याबरोबरच शैक्षणिक उपक्रमांना अनुभवाची जोड मिळाली. पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!