जामखेड न्युज——–
संजय कोठारी यांच्या सामाजिक कार्याची दखल शासनाने घ्यावी – न्यायाधीश विक्रम आव्हाड
महिलांसाठी सेवा सुविधांचा प्राधान्याने विचार करू – नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी

जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठान व जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन व समर्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जयभवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्था पिंपळगाव जलाल येवला जिल्हा नाशिक ते अहिल्यानगर जामखेड येरमाळा तुळजापूर अक्कलकोट ते गाणगापूर येथुन आलेल्या सायकल याञेचे स्वागत तसेच अहिल्यानगर येथील आनंदधाम फौंडेशन या संस्थेस अण्णदाता पुरस्कार व डॉ मिसबाह शेख यांनी जिल्हात पहिल्या ग्लुकोमा सर्जन ही पदवी मिळाली या बद्दल गौरव नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी व नगरसेवक व पञकारांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक आनंद कांतीलाल कोठारी, आयोजक संजय कोठारी न्यायाधीश विक्रम आव्हाड, न्यायाधीश सौ.पूजा आव्हाड, नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी, भाजपाचे युवा नेते अमित चिंतामणी, जय भवानी सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोरकडे, नेवासा नगर पंचायतचे कर निर्धार व प्रशासकीय अधिकारी सागर झावरे, आनंदधाम फौंडेशन चे अध्यक्ष अभय लुणिया, समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉ. भरत दारकुंडे, अहिल्यानगर येथील डॉ विठ्ठलराव विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालयचे प्राध्यापक व विभाग प्रमुख शरीर रचना शास्त्र विभाग डॉ. डॉक्टर सुधीर पवार , माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर राळेभात, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना या कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक आनंद कोठारी म्हणाले मी आमचे काका संजय कोठारी यांचे कार्य लहानपणापासून पाहत आहे बऱ्याच अपघातातील जखमी लोकांना आपण पाहू शकत नाही असे लोक हे स्वतः उचलून आपल्या रुग्णवाहिकेत आणतात आणि त्यांचे प्राण वाचवतात खरोखर त्यांना ही शक्तीच देवाने दिलेली आहे.

यावेळी या सायकल यात्रेमध्ये सपत्नीक असणारे न्यायाधीश विक्रम आव्हाड म्हणाले कोठारी यांच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही त्यांचं वय ६२ असेल ते तरुणांना लाजवेल असे काम करत आहे सर्व जाती धर्मासाठी काम करणारे संजय कोठारी यांच्या कार्याची केंद्र व राज्य सरकारने दखल घ्यावी.
गेले वीस वर्षापासून आमच्या ग्रुप मधील प्रत्येक व्यक्ती जामखेड कधी येईल आणि काकांचा सहवास कधी लावेल यासाठी वाट पाहत असतात त्यांनी आमच्या सायकल यात्रेची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था चांगल्या प्रकारे करतात.
यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात म्हणाले मी तर म्हणतो संजय कोठारी यांना एक व्यसनच लागले आहे व्यसन म्हणजे समाजसेवेचे व्यसन या माणसाला २४ तास कधीही फोन करा अपघात झाला आहे म्हटलं की स्वतः आपली रुग्णवाहिका घेऊन जाणार त्या गंभीर जखमी असो अगर किरकोळ जखमी असो यांना घेऊन ते ताबडतोब दवाखान्यात दाखल करून त्यांचे प्राण वाचवण्याचे काम खरोखर चांगल्या प्रकारे करत आहेत तसे पाहता कोरोना काळामध्ये त्यांनी खूप मोठे कार्य केले आहे.

यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष विजय भोरकडे म्हणाले आम्ही सुरुवातीला दोन जण येत होतो आमची राहण्याची व्यवस्था संजू काका करत होते परंतु आता जामखेडचे नियोजन पाहून आम्हाला जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळणे हात त्यांच्या कार्याचा वसा घेऊन आम्ही पुढे जात आहोत
यावेळी डॉक्टर सुधीर पवार म्हणाले संजय कोठारी यांची गेली सात आठ वर्षांपूर्वी पासून माझी भेट झाली आमच्या विखे पाटील फाउंडेशनला ते नेहमीच देहदान च्या माध्यमातून सहकार्य करत असतात त्यांनी आतापर्यंत ५०३ लोकांचे फॉर्म भरले असून आतापर्यंत २० लोकांचे देहदान केले आहे खरोखर त्यांचे कार्य खूप चांगल्या प्रकारे चालू आहे







