लाडकी बहिण खुश पण भाऊ आर्थिक विवंचनेत एकट्या जामखेड तालुक्यात तेवीस कोटींपेक्षा जास्त रक्कमेची बीले प्रलंबित

0
817

जामखेड न्युज—–

लाडकी बहिण खुश पण भाऊ आर्थिक विवंचनेत

एकट्या जामखेड तालुक्यात तेवीस कोटींपेक्षा जास्त रक्कमेची बीले प्रलंबित

शासनाच्या विविध योजनांचा गरजू लाभार्थी यांनी लाभ घेत योजना पुर्ण केली शासनाकडे त्यांची बीले सादर केली मार्च एण्ड ला बील निघेल अशी अपेक्षा असतानाही अद्याप बील मिळालेले नाही यामुळे अनेक लाभार्थी आर्थिक विवंचनेत सापडलेलेले आहेत. एकट्या जामखेड तालुक्यात कुशलचे 18 कोटी 54 लाख रुपये तर अकुशलचे 4 कोटी 58 लाख रुपयांची मार्च एण्ड लाच बीले प्रलंबित आहेत. आता तर आणखी रक्कम वाढलेली असेल.

दरवर्षी मार्च एण्ड ला कामाचे बीले मिळत असतात त्यामुळे लाभार्थी यांनी मार्च एण्ड च्या आगोदर उसणे पासणे पैसे घेऊन किंवा वेळ प्रसंगी कर्ज घेऊन कामे पूर्ण करत बील सादर करतात दरवर्षी मार्च एण्ड ला बील निघतेच पण या वर्षी मार्च एण्ड झाला तरी कोट्यवधी रुपयांची बीले प्रलंबित आहेत. यामुळे लाभार्थी आर्थिक विवंचनेत सापडलेलेले आहेत.

महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबातील निर्णायक भूमिका वाढवण्यासाठी महायुती सरकारने 29 जून 2024 रोजी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणयोजना” सुरू केली. या योजनेसाठी इतर योजनांचा निधी वळवल्यामुळे दरवर्षी मार्च एण्ड ला निघणारे बील अद्याप न मिळाल्यामुळे भाऊ मात्र आर्थिक विवंचनेत सापडलेला दिसत आहे.

महाराष्ट्र शासनामार्फत गरीब लोकांसाठी अनेक शासकीय योजना राबवल्या जातात. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी):या योजनेत, शहरी भागातील गरीब लोकांना घरे उपलब्ध करून दिली जातात. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण): या योजनेत, ग्रामीण भागातील गरीब लोकांना घरे उपलब्ध करून दिली जातात.

योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS) अंतर्गत राबविण्यात येते. या योजनेत, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात विहीर खोदण्यासाठी ४ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. अशा कितीतरी योजना आहेत गरजू लाभार्थी यांनी कर्ज घेऊन घर असेल, किंवा विहिर असेल अशी कामे पूर्ण केलेली आहेत मार्च एण्ड ला बील निघेल अशी अपेक्षा होती पण अद्याप बील च निघाले नाही यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक विवंचनेत सापडलेलेले आहेत.

घरकुले, विहिरी, रस्ते अशा कितीतरी योजनांचे काम पूर्ण होऊनही शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने बीले मिळालेली नाहीत यामुळे गरजू लाभार्थींना आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here