जामखेड शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार!!

0
556

जामखेड न्युज——

जामखेड शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार!!

जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भूतवडा तलावावरून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईप लाईनची वार्षिक देखभाल दुरुस्ती साठी दोन दिवस बंद राहणार आहे. तरी मंगळवार व बुधवार या दिवशी पाणी येणाऱ्या भागातील नागरिकांनी नोंद घ्यावी असे नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

लीकेजेस व दुरुस्तीसाठी मंगळवार दिनांक २१/ ०१ /२०२५ आणि बुधवार दिनांक २२/०१/२०२५ या दोन पूर्ण दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

जामखेड शहरातील नागरिकांनी नोंद घ्यावी व नगर परिषदेस सहकार्य करावे. या बाबतचे पत्र जामखेड नगरपरिषद प्रशासनाकडून काढण्यात आले आहे. जामखेड यांनी काढले असुन जामखेड नगरपरिषद हद्दीतील नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

एकेकाळी चौवीस तास पाणीपुरवठा होणारे शहर म्हणून ओळखले जाणारे जामखेड यामुळे आसपासच्या गावातील व जवळपास असणाऱ्या शहरातील लोक जामखेड मध्ये स्थायिक झाले. आता सध्या आठ दिवसातून एकदा एक तास पाणी
मिळत आहे.

भुतवडा तलावातून विना लाईटचे पाणी शहराला होत आहे. आता पाईपलाईन जुनी झाली आहे. आठवड्यातून एकदा एक तास पाणी मिळत आहे.
सध्या उजनी धरणातून पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच शहरातील नागरिकांना दररोज पाणी मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here