जामखेड न्युज——
श्री साकेश्वर विद्यालयात हळदी कुंकू व माता पालक मेळावा संपन्न
मुलांच्या शैक्षणिक प्रगतीत महिलांचा वाटा मोठा असतो. आपल्या मुलाची प्रगती कशी आहे याची माहिती व्हावी तसेच कोणत्या विषयात आणखी काय करावे याचे हितगुज करण्यासाठी श्री साकेश्वर विद्यालयात हंळदी कुंकू व माता पालक मेळावा घेण्यात आला होता. यासाठी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती प्रेमल वराट, साकतच्या सरपंच मनिषा पाटील, कुसुम वराट,धनश्री पाटील, छाया वराट, सुनिता वराट, रूपाली वराट, मिराबाई वराट, मालनबाई वराट, कोमल गवळी, जनाबाई घोडेस्वार, मंगल वराट, कल्पना वराट, चांगुना सानप, कविता लहाने, संजीवनी मुरूमकर, वर्षा वराट ,भामाबाई बहिर ,कोंडाबाई वराट, पुष्पांजली मुरूमकर यांच्या सह अनेक माता पालक उपस्थित होत्या.
विद्यालयातील महिला शिक्षक सुलभा लवुळ यांनी मुख्याध्यापक दत्ता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हळदी कुंकू व माता पालक मेळावा आयोजित केला होता. यावेळी शाळेची प्रगती तसेच शालेय पोषण आहार याबाबत माता पालकांनी शिक्षकांशी चर्चा केली.
मुख्याध्यापक दत्ता काळे यांनी आपल्या मुलांना चांगले वळण, चांगली सवय व संस्कार करण्याची शाळेबरोबर मातेची प्रमुख जबाबदारी आहे लहानपणी लागलेले संस्कार आयुष्यभर उपयोगी पडतात.
यावेळी मुख्याध्यापक दत्ता काळे, राजकुमार थोरवे, सुदाम वराट, महादेव मत्रे, अर्जुन रासकर, त्रिंबक लोळगे, सुलभा लवुळ, सचिन वराट, विजय हराळे, अतुल दळवी, आण्णा विटकर, आश्रू सरोदे यांच्या सह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.