महसूल सप्ताह 2023 ची सुरुवात नागेश विद्यालय उत्साहात संपन्न

0
179

जामखेड न्युज——

महसूल सप्ताह 2023 ची सुरुवात नागेश विद्यालय उत्साहात संपन्न

महसूल युवा संवाद सप्ताह 2023

१ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कालावधीमध्ये महसूल विभागामार्फत विविध योजनांचे मार्गदर्शन सप्ताह चे उद्घाटन श्री नागेश विद्यालय मध्ये करण्यात आले.

रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालयामध्ये प्रांत अधिकारी सायली सोळंके, तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाअंतर्गत महसूल सप्ताह 2023 निमित्त महसूल युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष नायब तहसीलदार मनोज भोसेकर, स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर ,राजेंद्र कोठारी, विनायक राऊत , प्राचार्य मडके बी के मुख्याध्यापिका चौधरी के डी, पर्यवेक्षक कोकाटे व्ही के , पर्यवेक्षक संजय हजारे, गुरुकुल प्रमुख संतोष ससाने ,एनसीसी ऑफिसर मयूर भोसले ,प्रा विनोद सासवडकर, सखाराम सप्रे तसेच श्री नागेश विद्यालय, ज्यूनियर कॉलेज, कन्या विद्यालय मधील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.


नायब तहसीलदार मनोज भोसेकर व मान्यवरांच्या हस्ते महसूल युवा संवाद सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.
महसूल विभागाअंतर्गत विविध शासनाचे माहितीचे क्यू आर कोडचे प्रसिद्धीकरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
क्यू आर कोडद्वारे महसूल विभाग व शासनाच्या विद्यार्थ्यांसंबंधी युवासंबंधी विविध योजनांची सर्व माहिती यावर उपलब्ध आहे. हा क्यू आर कोड सर्व युवा विद्यार्थ्यांना, शिक्षक, ग्रामस्थ यांना माहितीसाठी देण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांनी विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन ऑनलाईन माहिती मिळवावी, विविध दाखल्यांसाठी शासनाच्या वेबसाईटचा वापर करून वेळेत विविध दाखले काढून घ्यावे.
युवा संवादांतर्गत नवीन मतदार नोंदणी कशी करावी,1 जानेवारी 2024 रोजी 18 वर्षे वय पूर्ण होणाऱ्या युवकांना मतदार नोंदणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांचे विविध दाखले ,विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना, आधार कार्ड दुरुस्ती, ई पिक विमा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

महसूल सप्ताह 2023 ची सुरवात
१ऑगस्ट – शुभारंभ
२ऑगस्ट- युवा संवाद
३ ऑगस्ट- एक हात मदतीचा
४ ऑगस्ट- जनसंवाद
५ ऑगस्ट – सैनिक हो तुमच्यासाठी
६ऑगस्ट- महसूल विभाग कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी यांचा कर्मचारी संवाद
७ ऑगस्ट- महसूल सप्ताह सांगता व गुणगौरव
असे विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत अशी महिती देण्यात आली.
क्यू आर कोड कसा स्कॅन करावा त्या द्वारे विविध माहिती उपलब्ध होते याचे सविस्तर मार्गदर्शन नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांनी केले.
स्कूल कमिटी ज्येष्ठ सदस्य हरिभाऊ बेलेकर ,विनायक राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संभाजी इंगळे आभार प्रदर्शन संजय हजारे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here