Thursday, February 12, 2026
Home शैक्षणिक बातम्या लटकेवस्ती शाळेतील दोन विद्यार्थ्यांची नवोदय साठी निवड सलग सहाव्या वर्षी लटकेवस्ती शाळेचे...

लटकेवस्ती शाळेतील दोन विद्यार्थ्यांची नवोदय साठी निवड सलग सहाव्या वर्षी लटकेवस्ती शाळेचे यश

0
198

जामखेड न्युज——

लटकेवस्ती शाळेतील दोन विद्यार्थ्यांची नवोदय साठी निवड, 
सलग सहाव्या वर्षी लटकेवस्ती शाळेचे यश

एप्रिल 2023 मध्ये घेण्यात आलेल्या जवाहरलाल नवोदय विद्यालयाच्या परीक्षेचा निकाल 21 जून रोजी लागला असून यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लटकेवस्ती शाळेतील लक्ष्मी संभाजी लटके व साईस नवनाथ बहिर यांची निवड झाली आहे. सलग सहाव्या वर्षी लटकेवस्ती शाळेतील दोन विद्यार्थ्यांची नवोदयसाठी निवड झालेली आहे.

आतापर्यंत शाळाच्या नऊ विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी निवड झालेली असून शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना श्रीमती रसिका महालिंग गाढवे व श्रीमती अनिता विठ्ठल पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नवनाथ लटके,उपाध्यक्ष श्री रामचंद्र लटके,श्री राजेंद्र लटके,श्री भागवत निकम,श्री अशोक लटके,श्री संभाजी लटके,श्री दादा लटके,श्री विष्णू लटके,श्री अशोक पवार, ग्रामपंचायत सदस्य सौ राजश्री लटके, सरपंच सौ गिरीजा उतेकर, केंद्रप्रमुख श्री वांडरे सर,नायगाव केंद्रातील सर्व शिक्षक वृंद, गटशिक्षणाधिकारी श्री बाळासाहेब धनवे , गटविकास अधिकारी श्री प्रकाश पोळ यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!