पर्यवेक्षकांनी काळ्या फिती लावून केले दहावीच्या परीक्षेचे काम
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यातील बहुसंख्य विभागातील कर्मचारी कालपासून बेमुदत संपावर आहेत पण आज दहावीचा भुमीतीचा पेपर जामखेड तालुक्यातील सर्वच पर्यवेक्षकांनी काळ्या फिती लावून पर्यवेक्षकाचे काम केले.
श
यावेळी प्राचार्य, केंद्र संचालक, उपसंचालक, पर्यवेक्षकासह परीक्षेचे काम करणारे कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध व्यक्त करत काम केले.
यावेळी प्राचार्य, बी. के मडके,केंद्र संचालक विकास कोकाटे, उपसंचालक संजय हजारे, रघुनाथ मोहळकर, माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष पी. टी गायकवाड, सचिव रमेश बोलभट, प्रसिद्धी प्रमुख सुदाम वराट, रनर राघवेंद्र धनलगडे, ससाने एस. आर, ज्ञानदेव साळवे, राजकुमार थोरवे, मयुर भोसले, संतोष पवार, बाळासाहेब कावळे, तारकेश्वरी आढाव, मोहन यादव, सुग्रीव ठाकरे, मीरा साळुंखे, बाबासाहेब आंधळे यांच्या सह अनेक कर्मचारी उपस्थित होते.