जामखेड न्युज——
घर देता का घर यासाठी अँड अरूण जाधव यांच्या नेतृत्वाखाली मदारी समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला तरीही देशातील अनेक लोक घरापासून वंचित आहेत. गेल्या सहा वर्षापासून तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाज पाठपुरावा करत आहे तरीही ते घरापासून वंचित आहेत. तेव्हा अँड अरूण जाधव यांच्या नेतृत्वाखाली मदारी समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्यापासून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील २० मदारी कुटूंबांना शासनाच्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत २० घरे बांधुन देण्याचा शासन निर्णय दि. १/२/२०१६ ला घेण्यात आला होता. मात्र ६ वर्ष होवुनही वसाहतीच्या बांधकामास अद्याप सुरवात झाली नाही. आपल्या हक्काचे घर शासन कधीतरी बांधुन देईन या आशेवर मदारी बसले आहेत.

यासाठी ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली आ. रोहित पवार यांचे जामखेड येथिल कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समीती या ठिकाणी अनेक अंदोलने करण्यात आली मात्र हा प्रश्न मार्गी लागत नाही.

तसेच शासनासही काही फरक पडत नाही म्हणुन उद्या दि. ३ जानेवारी २०२२ रोजी वंचीतचे ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे धरणे आंदोलन मदारी समाज त्यांची पारंपारिक कला सादर करणार आहे.





