प्राचार्य श्रीकांत होशिंग यांची माय मराठी अध्यापक संघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी निवड जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा

0
138

जामखेड न्युज——

प्राचार्य श्रीकांत होशिंग यांची माय मराठी अध्यापक संघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी निवड

जामखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा!! 

ल ना होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य जामखेड तालुक्यातील मराठी विषयाचे एक महान गाढे अभ्यासक व हाडाचे शिक्षक,कवी, लेखक, नाट्यकलावंत, नाट्यदिग्दर्शक, खेळाडू व मनमिळाऊ स्वभाव व सदैव गोड भाषाशैली असणारे साहित्यिक प्राचार्य श्रीकांत होशिंग यांची माय मराठी अध्यापक संघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी जामखेड तालुक्यात ‘साहित्य परिषद ‘ स्थापना करून साहित्य चळवळ वाढविण्यासाठी सतत कार्यरत प्रयत्नशील व उपक्रमशील असतात

मराठी विषय अध्ययन व अध्यापनावरील असणारी अपार श्रद्धा, कष्ट, मेहनत आणि सृजनशीलता…
मराठी भाषा अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे संघटन व मार्गदर्शन करण्यात ते नेहमीच अग्रेसर असतात.

त्यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धव देशमुख, उपाध्यक्ष अरूण शेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे सह सर्व संचालक मंडळ तसेच संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

माय मराठी अध्यापक संघ महाराष्ट्र राज्य
माय मराठी अध्यापक अहमदनगर संघ कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे.

अध्यक्ष – श्री. दीपक माधव पाचपुते (अकोले )
कार्याध्यक्ष-श्री.श्रीकांत बाळकृष्ण होशिंग (जामखेड )
उपाध्यक्ष -1) सौ. श्रद्धा सुनील नागरगोजे. (अहमदनगर )
2) श्री अशोक नाथा गर्जे ( पाथर्डी.)

सचिव – श्री. बाळासाहेब सोपान डोंगरे (राहुरी )

सहसचिव – श्री.बाळासाहेब बबन जाधव (संगमनेर )

खजिनदार – १) श्री दहिफळे एकनाथ कारभारी(श्रीरामपूर )

जिल्हा संघटक – सौ.अलका हनुमंत पाटील (नेवासा )
विद्या समिती अध्यक्ष -आगळे भगवान दामोधर (नेवासा )

सचिव – श्री. बाळासाहेब मल्हारी कडू (संगमनेर )
सदस्य

1) अण्णासाहेब विठ्ठल खाडे (राहुरी )
2) श्री. राजगुरू संजय सीताराम (नेवासा )
3)वारुळे सुरेश (श्रीरामपूर )
4) आघाव अशोक रामदास (राहुरी )

सल्लागार –
1)श्री. दिघे राधाकिसन बाबुराव.(संगमनेर ) 2)श्री कचरे संतोष रामा (अकोले )
3) श्री. बनकर बाळासाहेब कोंडीबा (अकोले )
श्री. बाळासाहेब बबन जाधव (सहसचिव )

प्राचार्य श्रीकांत होशिंग यांची माय मराठी अध्यापक संघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज विद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने श्री श्रीकांत होशिंग साहेबांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी उपमुख्याध्यापक श्री रमेश अडसूळ, पर्यवेक्षक श्री बाळासाहेब पारखे, ज्येष्ठ शिक्षक श्री शहाजी वायकर, श्री प्रवीण गायकवाड, श्री बबन राठोड, श्री भरत लहाने, श्री पोपट जगदाळे, कलाशिक्षक राऊत मुकुंद, समारंभ प्रमुख नरेंद्र डहाळे, शिक्षक प्रतिनिधी रोहित घोडेस्वार, श्री विशाल पोले, किशोर कुलकर्णी, क्रीडा प्रमुख राघवेंद्र धनगडे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी विभाग प्रमुख श्री अनिल देडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री भरत लहाने यांनी केले

कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here