Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षामुळेच भाजपाला चांगले दिवस – नामदार धनंजय मुंडे

गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्षामुळेच भाजपाला चांगले दिवस – नामदार धनंजय मुंडे

0
311
जामखेड प्रतिनिधी 
               जामखेड न्युज – – – – 
  “स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांनी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष केला. मी त्यांच्या संघर्ष चा वारसा पुढे चालवत आहे. मुंडे साहेबांचे जे स्वप्न होते ते मी पूर्ण करणार. त्यांना एका जातीपुरते मर्यादित करू नका. ते संपूर्ण महाराष्ट्राचे नेते होते त्यांची पुण्यतिथी अथवा जयंती साजरी करण्याचा अधिकार सर्व धर्मियांना आहे”गोपीनाथ मुंडे यांनी जीवनभर संघर्ष केला त्यांनी संघर्ष यात्रा काढल्या म्हणूनच भाजपला चांगले दिवस आले आहेत असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री  धनंजय मुंडे यांनी केले.
 जामखेड येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने  स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर व हरी कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता याप्रसंगी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी,अण्णासाहेब चौधरी उपस्थित होते.
 जामखेड येथे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा आठवी पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांचे कीर्तन झाले सकाळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे प्रतिमापूजन झाले नंतर दिवसभर रक्तदान शिबिर सुरू होते सायंकाळ पर्यंत १२१ दात्यांनी रक्तदान केले.
   ना. धनंजय मुंडे पुढे म्हणाले “गोपीनाथ मुंडे यांनी जीवनभर संघर्ष केला त्यांनी संघर्ष यात्रा काढल्या म्हणूनच भाजपला चांगले दिवस आले. म्हणूनच युतीचे सरकार महाराष्ट्रात देऊ शकले.  मी त्यांच्या छत्रछायेखाली वाढलो त्यामुळे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन यांच्यासारख्या लोकांच्या जवळ मला जाता आले.  मुंडे साहेबांनी मला घडवले परंतु  माझ्या पडत्या काळामध्ये खा. शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझी पाठराखण केली. माझ्यावर लोकांनी दगडफेक केली शिव्या दिल्या “धन्या” शिवाय मला कोणी बोलत नव्हते परंतु त्याच धन्याचा आज “धनुभाऊ” झाला आहे. साहेबांच्या जीवनात इतका संघर्ष होता तितका संघर्ष मीही भोगला आहे. मुंडे घराण्याला संघर्ष पाचवीला पुजलेला आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची ऊस तोड मजूरांविषय खूप मोठी तळमळ होती. त्यांचा तो वारसा पुढे चालवताना त्यांच्या नावाने ऊसतोड महामंडळ आम्हाला स्थापन करता आले व या महामंडळाची घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी महाराष्ट्रामध्ये ठिकाणी वसतिगृहे उभारण्याचे काम सुरू आहे. आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नातून जामखेड येथे पहिले वस्तीगृह सुरू होत आहे. याचा मला अभिमान आहे.
    आ. रोहित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जीवन चरित्राला स्पर्श करत त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले ” मुंडे साहेब होते तोपर्यंत मी राजकारणात नव्हतो परंतु मला दोन वेळा त्यांना भेटण्याचा प्रसंग आला त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे होते मी दोन वेळा त्यांची भेट घेतली त्यांचे व्यक्तिमत्व फार मोठे होते.  केंद्रामध्ये आजचे सरकार दिसत आहे त्याचे त्याचे बरेचसे श्रेय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना आहे वंजारी समाजाला संत भगवान बाबा संत वामनभाऊ संत गीते बाबा यांनी आपल्या मौलिक विचाराने दिशा दिली व मुंडे साहेब यांनी हा समाज यशाच्या शिखरापर्यंत नेऊन पोचवला. पक्ष कोणताही असो स्व. प्रमोद महाजन, स्व. विलासराव देशमुख व स्व. गोपीनाथ मुंडे ही माणसं महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप मोलाची होती. “
      यावेळी पवार यांनी जामखेड तालुक्यामधील जमादारवाडी येथील श्री संत वामनभाऊ महाराज मंदिरासाठी २५ लाख रुपयांचा सभा मंडप मंजूर केल्याची घोषणा केली. त्याचबरोबर दिघोळ येथील गीते बाबांच्या समाधी मंदिराचा संपूर्ण आराखडा तयार केलेला असून शासनाकडून भरीव मदत यासाठी मिळवले आहे तेथे भगवान बाबा व गीते बाबा यांची मूर्ती बसविण्यात येणार असून तो सोहळा लवकरच होणार आहे. खर्डा भागातील समाज बांधवांनी या कार्यामध्ये मोलाचे सहकार्य केले आहे असे आमदार रोहित पवार यांनी यावेळी सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!