जामखेड न्युज – – –
तालुक्यातील खर्डा येथिल मदारी समाजाच्या वसाहतीच्या बांधकामासाठी अॅड अरूण जाधव यांच्या नेतृत्वाखाली मदारी समाज पदयात्रा काढणार होते. याची प्रशासनाने दखल घेऊन दहा दिवसात वसाहतीचे काम सुरू होणार असे आश्वासन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी सांगितले त्यामुळे मदारी समाजामधे आनंदाने वातावरण आहे.
ADVERTISEMENT
अॅड अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली मदारी समाज पदयात्रा काढणार होता.व मुख्यमंत्र्यांना निरोप देण्याचे काम या पदयात्रेतुन होणार होते.याची दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ 10 दिवसात बांधकामास सुरवात करणार असल्याचे बी डी ओ चे पत्र मिळाले.
2015 पासून खर्डा येथे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत मदारी समाजास 20 घरे मंजूर झाली.त्याचा पाठपुरावा लोक अधिकार आंदोलन या संघटनेने केला,पुढे वंचित बहुजन आघाडीने पाठपुरावा चालूच ठेवला.एकूण 5 आंदोलने तहसील व पंचायत समिती तसेच आमदारांच्या कार्यालय समोर केली.पण यश मिळत नव्हते,यामुळे वंचीतने अधिक आक्रमकपणे पुढे येऊन मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याकरिता भर उन्हात मदारी समाजास सोबत घेऊन ऍड.अरुण जाधव यांनी पदयात्रेचे नियोजन केले होते.यास 7 वर्षानंतर यश मिळाले आहे.
वंचीत मुळे मदारी समाजास हक्काचे घर मिळणार आहे.
बी डी ओ कडून पत्र स्वीकारताना बापु ओहोळ (लोक अधिकार आंदोलन),आतिष पारवे (वंचीत ता.अध्यक्ष),अजिनाथ शिंदे(वंचीत शहर अध्यक्ष) उपस्थित होते.
या वसाहतीसाठी विशाल पवार,द्वारका पवार,हुसेन मदारी,सरदार मदारी,सलीम मदारी गणपत कराळे,नितीन अहेर, दत्तराज पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच खर्डा ग्रा.पंचायत,सर्व पत्रकार बंधू,प्रशासकीय अधिकारी यांनी सहकार्य केले.